संकल्प हिंदू टाइम्स

10th December 2024

Aus vs wi : घरात जाऊन हरवलं, Shamar Joseph ठरला हिरो

तुमच्या मित्रांना शेअर करा

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने रविवारी ऑस्ट्रेलिया संघाला त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या द गॅबा स्टेडियमवर पराभव केला. 8 धावांनी हा सामना जिंकत वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. वेस्ट इंडिजसाठी हा विजय खूप खास होता. गेल्या 36 वर्षात ऑस्ट्रेलियाला गॅबावर पराभूत करणारा वेस्ट इंडिज भारतानंतरचा दुसराच संघ आहे. वेस्ट इंडिजच्या या विजयानंतर ब्रायन लारा, कार्ल हुपर असे दिग्गज माजी क्रिकेटपटू भावूक झाले.