सिनेमा लिबर्टीच्या नावाखाली आता हे सिनेमावाले आमच्या हिंदू धर्माच्या आराध्यांना गाण्याच्या नावावर नाचवणार आहेत का….पानिपतकार विश्वास पाटील


छ.शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र छ. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्या काळामध्ये स्वराज्याच्या सीमा वाढवण्याबरोबरच स्वराज्य टिकवणं जास्त महत्वाचं आवश्यक होतं. अवघं 32 वर्षांचं आयुष्य. पण धर्मांतरणासाठी औरंगजेबाकडून अनन्वित अत्याचार होऊनही ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले. शेवटी औरंगाजेबाने नरकयातना देऊन त्यांना ठार करण्याचा आदेश दिला आणि एक धगधगती मशाल शांत झाली. स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचं कार्य, चरित्र, विचार, त्यांचा इतिहास लोकांसमोर आणावा या सदहेतूनेचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिवाजी सावंतांच्या छावा या कादंबरीवर आधारित छावा चित्रपट केला.
काही आक्षेपार्ह दृश्यांमुळे हा सिनेमासंदर्भात वाद निर्माण झाले. यासंदर्भात संभाजी पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील यांनी हिंदू टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले बलदंड शरीर, चौखूर उधळलेल्या घोड्यावर समुद्रकीनारा, डोंगरदऱ्यातून फिरणारे संभाजी. पण लेझीम घेऊन लहान मुलांसारखे नाचणारे संभाजी तेही लावणी नृत्यासारखे अंगविक्षेप. महाराणी येसूबाई…… छ. संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने येसूबाईंना जवळ – जवळ 18 वर्षे राजबंदी केले होते. पण येसूबाईंची जरब इतकी होती की क्रूरकर्मा औरंगजेबाचंही धाडस नव्हतं त्यांच्या नजरेला नजर देऊन बोलण्याचं . अशी ही करारी स्त्री. तीही या सिनेमामध्ये लेझीम खेळते? किती हे हिडीस नृत्य. लेखक विश्वास पाटील पुढे असं म्हणतात मर्द नाचत नव्हते. त्यांच्या तलवारी नाचत होत्या. लोकांना संयक्तिक काय आहे ते दाखवा. लूक म्हणून काहीही दाखवता? लोकांना ते digest कसं होणार? असं म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला.

लेखक शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट बनवला आहे. अधिकृतरित्या या कादंबरीचे हक्कही खरेदी केले आहेत. या कादंबरीत संभाजीराजे होळीचा उत्सव साजरा करायचे आणि होळीच्या आगीतून नारळ बाहेर काढायचे असा उल्लेख आहे त्यामुळे चित्रपटात महाराजांना आपला पारंपरिक खेळ लेझीम खेळताना दाखवलं आहे. – दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर
“सरकारची यात काही भूमिका नाही. क्रिएटीव्हीटीआणि सेन्सिटीव्हीटी सोबत विकृतीकरण न करता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास योग्य दाखवला जावा, असं आम्हाला वाटतं. – देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)
इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन संबंधित प्रसंगामध्ये आवश्यक बदल केल्यास वाद संपेल. – उदयनराजे भोसले
अपेक्षित बदल होतील आणि सिनेमा पडद्यावर येईलही. पण सिनेमॅटिक लिबर्टी च्या गोंडस नावाखाली हिंदूंचे देव, महानायक, हिरो यांची अभ्यासपूर्वक उभी केलेली प्रतिमा बदलणे हा त्या व्यक्तींचा अपमान आहे. वारंवार घडणाऱ्या अशा गोष्टी थांबवल्या पाहिजेत.