“मैं मेरी झांसी नही दूंगी” या आवेशात ‘ही माझी मुंबई आहे, ही तुम्हाला लुटायला देणार नाही’ असं वक्तव्य उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय गटाच्या मेळाव्यात केलं. यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची आठवण काढत म्हटलं की “माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रथम ५ नेत्यांपैकी एक होते.” प्रबोधनकारांचं संयुक्त महाराष्ट्रातील योगदान मुंबईकरांना मान्यच आहे. इतकंच काय तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं मोठेपणही मुंबईकरांना मान्य आहे. मात्र इथे प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वाचा आणि कारकिर्दीचा आहे. आदित्य ठाकरे यांच्या सामाजिक प्रतिमेचा आहे. त्यांच्या कौटुंबिक वारशाचा हा प्रश्न नाही हे समजून घेतलं पाहिजे. ही माझी मुंबई आहे, या वाक्यामध्ये मुंबईबद्दलचं प्रेम कमी आणि मुंबई ही आपल्याला जणू वारसाहक्काने मिळालेली याबद्दलचा अहंकार अधिक झळकतो. उद्धव ठाकरे यांचं मुंबईवर खरोखरंच प्रेम असेल तर त्यांनी घरी बसून (वर्क फ्रॉम होम) एक नोंदवही बनवायला हवी आणि गेल्या २५ वर्षांत आपण मुंबईसाठी काय योगदान दिलं याची नोंद करुन करायला हवी. २५ वर्षांचा काळ हा खूप मोठा काळ असतो. या २५ वर्षांत एक पिढी वृद्धत्वाकडे झुकत असते, एक पिढी सज्ज असते आणि पुढची पिढी तयार होत असते. त्यामुळे या नोंदवहीची किमान २५ पाने जरी भरली तरी उद्धव ठाकरेंनी बरंच काही साध्य केलं असं समजायला हरकत नाही. मात्र २५ काय ५ पाने भरताना मुश्किल होईल अशी स्थिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाची पद्धत जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर कोरोना काळातील त्यांच्या कारभाराचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण मुख्यमंत्री झाल्यामुळे ते पहिल्यांदा संविधानिक पदावर विराजमान झाले होते आणि ते भारतातले एकमेव असे मुख्यमंत्री होते, ज्यांनी थेट काम न करता, कार्यालयात न जाता घरी राहणं पसंत केलं. ज्यावेळी युद्धाची वेळ आली, तेव्हाच शस्त्रे मातीत गाडून टाकली, असा योद्धा विरळाच! यास त्यांनी वर्क फ्रॉम होम असं गोंडस नाव दिलं. हा काळ सर्वात कठीण असा काळ होता आणि या काळात कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सर्वांत पुढे असायला हवं होतं. मात्र ते मागे राहिले. या दरम्यान त्यांच्यावर प्रचंड टिका झाली. म्हणून पीआर एजेन्सीजना सांगून कदाचित “बेस्ट सीएम”चा सर्व्हे वेळोवेळी करवून घेतला. आजकाल तो सर्व्हे वारला आहे, असे जाणवते. कोरोना काळ जर आपण पाहिला तेव्हा रुग्णांची सुरक्षा जितकी महत्त्वाची होती, तितकीच महिलांची सुरक्षाही महत्त्वाची होती. अनेक महिला डॉक्टर, परिचारिका, पोलिस कर्मचारी दिवस रात्र काम करत होते. हा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत कठोर असा गेला. नवी मुंबईत क्वारंटाइन सेंटरमध्ये एका कर्मचाऱ्याने एका महिला रुग्णावर बलात्कार केला. मालाडमधील जनकल्याण नगरातील कोविड सेंटरमध्ये २१ वर्षीय तरुणीची छेड काढल्याची घटना घडली. एका रिपोर्टनुसार २०२० मध्ये ७६६ बलात्काराच्या घटना घडल्या. ४५५ प्रकरणांमध्ये अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचार झाले आहेत. मात्र ते मागे राहिले. या दरम्यान त्यांच्यावर प्रचंड टिका झाली. म्हणून पीआर एजेन्सीजना सांगून कदाचित “बेस्ट सीएम”चा सर्व्हे वेळोवेळी करवून घेतला. आजकाल तो सर्व्हे वारला आहे, असे जाणवते. कोरोना काळ जर आपण पाहिला तेव्हा रुग्णांची सुरक्षा जितकी महत्त्वाची होती, तितकीच महिलांची सुरक्षाही महत्त्वाची होती. अनेक महिला डॉक्टर, परिचारिका, पोलिस कर्मचारी दिवस रात्र काम करत होते. हा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत कठोर असा गेला. नवी मुंबईत क्वारंटाइन सेंटरमध्ये एका कर्मचाऱ्याने एका महिला रुग्णावर बलात्कार केला. मालाडमधील जनकल्याण नगरातील कोविड सेंटरमध्ये २१ वर्षीय तरुणीची छेड काढल्याची घटना घडली. एका रिपोर्टनुसार २०२० मध्ये ७६६ बलात्काराच्या घटना घडल्या. ४५५ प्रकरणांमध्ये अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचार झाले आहेत. विशेष म्हणजे हा काळ लॉकडाऊनचा होता कोरोनाचा संकट आलं असताना लॉकडाऊन चा काळ असताना जर महिलांवरील अत्याचाराची इतकी प्रकरणे नोंदवली गेली असतील तर कोणत्या आधारावर उद्धव ठाकरे यांना बेस्ट सीएमचा किताब बहाल केला गेला? त्यात अनेक कोविड सेंटरची अवस्था दयनीय होती. तसेच बॉडी बॅग घोटाळा, खिचडी घोटाळा, कोविड सेंटर उभारणी घोटाळे इत्यादी प्रकरणेही समोर आली. आता आपण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महानगरपालिकेचा महिला सुरक्षा विषयीचा पराक्रम पाहूया. गेल्या पंचवीस वर्षांत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतून हजारो कोटी रुपये “महिला सुरक्षा” आणि “सेफ सिटी” योजनांवर खर्च झाले. तरीही मुंबईत आजही रात्री ११ नंतर एकटी मुलगी रस्त्यावरून फिरु शकत नाही.

स्त्री ही सुरक्षित नाही, केवळ स्त्रियांवरील अत्याचारांमुळेच नव्हे तर विविध प्रकारच्या सामान्य सुविधा न पुरवल्यामुळे महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. सर्वात पहिली समस्या म्हणजे मुंबईतील स्वच्छतागृहे. इतकी वर्षे सत्ता उपभोगूनही स्वच्छतागृहांवर पालिकेला व्यवस्थित काम करता आलेलं नाही. नरेंद्र मोदी केंद्राच्या राजकारणात आले तेव्हा “पहले शौचालय, फिर देवालय” ही घोषणा त्यांनी केली. त्या घोषणेच्या आधारावर स्वच्छतागृहांची मोहिम सुरु झाली. स्वच्छतागृहे निर्माण झाली आणि मंदिरही निर्माण झाले. मात्र २५ वर्षे सत्ता उपभोगत असताना या प्रश्नावर ठाकरेंना काम का करावसं वाटलं नाही? मुंबईतील महिला या कामावर जाणाऱ्या महिला आहेत. कामावर जाताना, येताना त्यांना या समस्येला सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. मूत्रपिंडाचे आजार उद्भवतात. बडोद्याचे मराठमोळे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या काळात महिलांची समस्या जाणली आणि स्वच्छ शौचालये उभारली. त्यातूनच मोदींनी प्रेरणा घेतली. पण मराठी अस्मितेवर भाषणे देणाऱ्या ठाकरेंनी मात्र या प्रश्नाकडे पाठ फिरवली. आजही जी शौचालये आहेत, त्यांची अवस्था पाहवत नाही. या शौचालयात निरोगी माणूस गेला तर रोगी होऊन बाहेर निघेल. मुंबईत अनेक ठिकाणी स्ट्रिटलाईट्स नसल्याने महिलांना असुरक्षिततेचा अनुभव येतो. या स्ट्रिटलायटिंगवर देखील अनेक कोटी रुपये खर्च झाले असूनही व्यवस्थित कामे झालेली नाही. काही शौचालयांमध्ये चांगल्या लाईट्स नसतात. अशा परिस्थितीचा नराधम फायदा घेतात आणि महिलांवर अत्याचार करतात. २०१७ मध्ये केंद्र सरकारने “सेफ सिटी प्रोजेक्ट” सुरू केला, ज्यात मुंबईसह आठ शहरांसाठी १,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. यात पालिकेचीही भागीदारी आहे. तर सीसीटीव्ही, स्मार्ट स्ट्रीट लाइट्स आणि आपत्कालीन हेल्पलाइन योजनांचे काय झाले हा सवाल मुंबईकर विचारत आहेत. आज ठाकरे कुटुंब परप्रातीयांच्या समस्येवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत. या वादामध्ये अर्णव खैरे नावाच्या एका मराठी लेकराचा जीव गेला. पण ठाकरेंकडून एकदाही खंत किंवा काळाजी व्यक्त केली गेली नाही. मुळात परप्रातीयांची समस्या वाढली कशी? त्यांना घरे कोणी दिली? इतर राज्यांतून येणारे परप्रांतीय सोडा पण बांगलादेशी इत्यादी परदेशी लोक इथे आले कसे? याचा विचार करायला हवा. ‘साहेबांना’ कुणी काही बोललं तर हे लोक टोळकी घेऊन सर्वसामान्य माणसाला घरात जाऊन मारहाण करतात. मात्र जेव्हा खरा पराक्रम दाखवायचा असतो तेव्हा गायब कसे होतात? एक उदाहरण सांगतो, म्हणजे स्पष्ट होईल. त्या काळी राज ठाकरे हे परप्रांतीयांविरुद्ध आवाज उठवत होते. त्यांचे कार्यकर्ते परप्रांतीयांना मारतही होते. पण आझाद मैदान दंगल झाली तेव्हा राज ठाकरेंनी शांततेत मोर्चा काढला. तेव्हा खळखट्ट्याक केलं नाही. अर्थात त्यांनी खळखट्ट्याक करावं असं माझं म्हणणं नाही. मात्र दंगलखोरांबाबत मवाळ भूमिका आणि सामान्य नागरिकांबाबत जहाल भूमिका, हे ठाकरे बंधू यांचे वागणे संशयास्पद आहे. या दंगलीत महिला पोलिसांवरही हात टाकण्यात आला होता. या अशा गुंडांमुळे मुंबई असुरक्षित झाली आहे. मात्र इतकी वर्षे महापालिका हातात असूनही उद्धव ठाकरेंना या गुंडांवर नियंत्रण मिळवता का आले नाही? मुंबई आमची आहे, असं म्हणता मग हे गुंड इथे कोणी बसवले? याचं उत्तर तुमचाकडे आहे का? विशेष म्हणजे सध्या फेरीवाल्यांची जी संख्या वाढलेली आहे, ती भयानक आहे. आझाद मैदान दंगल प्रभृती लोकांनी फेरीवाला विभाग हातात घेतला आहे की काय अशी शंका येते. हे लोक आले कुठून? हे लोक मुंबईकर नाहीत? इतकंच काय हे भारतीय तरी आहेत का? असा प्रश्न सामान्य मुंबईकरांच्या मनात उत्पन्न होतो.
मुंबईत पसरलेलं ड्रग्जचं जाळं हे देखील महिलांच्या सुरक्षेला बाधक आहे. काही गार्डन्समध्ये चरसी लोकांचं साम्राज्य असतं. तिथे महिला व लहान मुले कसे जातील? ज्येष्ठ अभिनेते शाहरुख खान यांच्या मुलाला ड्रग्ज पार्टी करताना पकडण्यात आलं होतं.
उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा बॉलिवुडशी जवळचा संबंध आहे. तो असायला हरकत नाही. मात्र सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूमध्ये त्यांचं नाव गोवण्यात आलं होतं. अर्थात ते आरोप होते. जे अजून सिद्ध झालेले नाहीत. मात्र दिशा सालियानच्या वडिलांच्या वकिलांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आणि विकृत स्वरुपाचे आहेत.
त्यामुळे मराठी माणसाच्या, मुंबईकरांच्या, महिलांच्या मनात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना उमटली आहे. ती ठाकरेंनी पुढे येऊन दूर करायला हवी. जनतेला मार्गदर्शन करायला हवे. मात्र तसे झाले नाही.
मुंबईतील वाढती झोपडपट्टी ही ठाकरेंच्या काळात वाढलेली नाही का? मराठी माणूस तर अजूनही झोपडपट्टीत राहतो. मात्र बाहेरुन आलेल्या लोकांना घरे मिळाली. मग मुंबईकरांना घरे कधी मिळणार?


तसेच रस्त्यांची समस्या, पाथहोल्सची समस्याही मोठी आहे. या समस्यांमुळे किती अपघात झाले आहेत? आरे कार शेडवरुन ठाकरेंनी आंदोलन उभं केलं. डफलीवाले शहरी नक्षली यात सहभागी झालेले असतानाही केवळ ठाकरेंच्या अहंकारासाठी हे काम रखडलं.
मुंबईतील महिला कामावर जातात, ट्रॅफिकमध्ये अडकतात, घरी यायला उशीर होतो तेव्हा घरच्यांना काळजी वाटते की माझी मुलगी, माझी पत्नी, माझी बहिण कधी घरी येईल? मेट्रोचं जाळं मुंबईभर पसरल्यामुळे महिलांना सुविधाजनक व सुरक्षित प्रवास करता येतो.
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या अहंकारामुळे हा प्रकल्प रखडला होता, जर सत्ता पालट झाला नसता तर अजूनही हा प्रकल्प रखडलाच असता. त्याची भरपाई कशात करणार? म्हणजेच महिलांच्या व सामान्य जनांच्या सुरक्षेपेक्षा यांचा इगो मोठा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर त्यांच्या मार्गावरुन चाललं पाहिजे.
महाराजांचे मावळे जनतेचं रक्षण करायचे आणि दुर्जनांना शासन करायचे. यांच्या कार्यकर्त्यांचा वेगळाच गोंधळ सुरु असतो. परस्त्रीला इतकेच काय तर शत्रूच्या पक्षातील स्त्रीलाही माता म्हणण्याचे गुण छत्रपतींमध्ये होते. महिलांचं रक्षण करण्याचं धोरण त्यांनी अवलंबिलं होतं. मात्र इथे यांचे नेतेच महिलांचा अपमान करतात.
संजय राऊत पत्रकारांसमोर जी ‘ए’ दर्जापेक्षाही हीन भाषा वापरतात. त्यातून मुलांवर काय संस्कार घडणार आहेत? महिला व मुली या पत्रकार परिषदा निःसंकोचपणे पाहू शकतात काय?
मलिष्का यांनी मुंबई पालिकेच्या कारभारावर टीका केली तर त्यांच्यावर किती वैयक्तिक व गलिच्छ टीका झाली? त्यांच्या घरात अळ्या शोधायला पालिकेचे कर्मचारी घुसले.
कंगणा राणौत यांच्यासाठीही गलिच्छ भाषा खुद्द यांचे नेतेच वापरतात, मग सामान्य कार्यकर्त्यांची काय दैना असेल विचार करा. त्यांचं घर पाडायला पालिकेचे कर्मचारी गेले. स्वप्ना पाटकर यांचं प्रकरणही फार जुनं नाही.
मग महिला यांच्या शासनकाळात स्वतःला सुरक्षित कशा म्हणवून घेऊ शकतील? दुसरी गोष्ट यांच्यावर टिका केली की हे यांच्या हातात जे प्रशासन असते, त्याचा गैरवापर करतात.
नारायण राणे आणि अर्णव गोस्वामीला जणू ते अतिरेकी असल्याप्रमाणे दिलेली वागणूक आपल्याला आठवतच असेल. मग यांच्या हातात जनतेचं शासन का द्यावं? सामान्य लोकांवर अन्याय करायला?
या आणि अशा अनेक समस्या मुंबईत आ वासून उभ्या आहेत, ज्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. माझी मुंबई मी इतरांच्या हाती जाऊ देणार नाही असे म्हणताना जबाबदारी स्वीकारायाला हवी.
मी काय करुन दाखवू शकतो याचं मॉडेल उभं करायला हवं. आपण कुटुंब प्रमुख म्हणवून घेतो तेव्हा तसे वर्तन असायला हवे. आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या कीर्तीमुळे नव्हे तर आपल्या कर्तृत्वामुळे, शालीनतेमुळे लोकांनी आपल्याला मान द्यायला हवा.
‘मैं मेरी झांसी नही दूंगी’ या आवेशात ‘ही माझी मुंबई आहे, ही तुम्हाला लुटायला देणार नाही’ म्हणताना झाशीच्या राणीच्या चरित्राचा अभ्यास तरी करायला हवा. झाशीच्या रक्षणासाठी ती प्राणपणाने लढली. पण त्याआधी ती उत्तम शासक होती.
मुंबई माझी म्हणताना त्यात अहंकार नको, तर अभिमान हवा. म्हणून या सर्व बाबींमुळे मराठी माणूस आणि सामान्य मुंबईकर पुन्हा ठाकरेंच्या हाती मुंबई सोपवायला घाबरत आहे.
महिलांना उद्धव ठाकरेंमध्ये वडील, सुपुत्र, बंधू, रक्षक दिसायला हवे होते. माननीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा दिसायला हवी होती. मात्र तसे झाले नाही.
राम वनवासात गेलेला असताना कैकेयीची कान उघडणी करताना वसिष्ठ ऋषी म्हणतात,
“जिथे राम नाही ते राष्ट्र होऊ शकत नाही आणि जिथे राम आहे ते अरण्यही समृद्ध राष्ट्र म्हणून उभे राहील.“
सत्ताधीश असा हवा. रामासारखा… महिलांचं रक्षण करण्यासाठी प्राणाची बाजी लावणारा…
