सकल हिंदू संमेलन, ज्ञानप्रबोधिनी वस्ती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
सकल हिंदू परिषद, ज्ञानप्रबोधिनी वस्ती यांच्या वतीने एक प्रेरणादायी व ज्ञानप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ह.भ.प. परेशबुवा देवळणकर यांनी धर्माची व्याख्या अत्यंत सुंदर व प्रभावी पद्धतीने मांडत धर्माचे समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर इतिहासतज्ज्ञ श्री. अभयजी माटे यांनी संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याचा आढावा घेत संघाची महत्ता तसेच डॉ. हेडगेवार यांच्या बालपणापासूनच हिंदू समाजाप्रती असलेल्या कार्याची प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली.तसेच सौ. विनयाताई मेहेंदळे यांनी “पंच परिवर्तन” या विषयावर अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुंदर व ओघवते निवेदन गौतमीताई जोशी यांनी केले.कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी सौ. वल्लरी करंदीकर यांनी गायन सेवा सादर केली. त्यांच्या सुमधुर गायनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानप्रबोधिनी वस्तीच्या वतीने अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती ज्ञानप्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष प्रणव गोडबोले यांनी हिंदू टाइम्सला दिली.