“धर्मांतर, छळ आणि संघर्ष… अखेर मिस इंडिया अर्थ विजेती सयाली सुर्वेची घरवापसी”
मिस इंडिया अर्थ २०१९ विजेती सयाली सुर्वे पुन्हा हिंदू धर्मातमिस इंडिया अर्थ २०१९ विजेती Sayali Surve यांनी पिंपरी-चिंचवड येथे विधीपूर्वक हिंदू धर्म स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू धर्मात परतल्यानंतर त्यांनी आपले नाव आद्या सुर्वे असे ठेवले आहे.सयाली सुर्वे यांचा जन्म मुंबईत झाला असून त्यांचे बालपण पुण्यात गेले. त्यांनी एव्हिएशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. २०१९ साली त्यांनी मिस इंडिया अर्थ हा किताब पटकावला होता.माहितीनुसार, कुटुंबीयांचा विरोध असतानाही सयाली यांनी २०१९ मध्ये मीरा-भाईंदर येथील व्यावसायिक Aatif Tase यांच्याशी विवाह केला होता. विवाहानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि त्यांचे नाव अतेजा तासे असे ठेवण्यात आले होते. मात्र काही काळानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला.सयाली सुर्वे यांनी माध्यमांशी बोलताना पतीकडून छळ होत असल्याचे गंभीर आरोप केले. लग्नानंतर काही दिवसांतच त्रास सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे अनेकदा तक्रार करण्याचा प्रयत्न केला, परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.काही महिन्यांच्या त्रासानंतर त्यांनी विविध हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड येथे विशेष धार्मिक विधी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात हवन व मंत्रोच्चार करून शुद्धीकरण विधी करण्यात आला आणि त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला.माध्यमांशी संवाद साधताना सयाली सुर्वे म्हणाल्या की, “अतीफ तासे यांच्याशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. अशा प्रकारचा त्रास सहन करणाऱ्या मुलींनी गप्प बसू नये. देवाने आपल्याला जीवन अशा रावणांसमोर हार मानण्यासाठी दिलेले नाही.”या घटनेमुळे सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न पुन्हा चर्चेत आले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबतही विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.