Sankalp Hindu Times

March 18, 2026

देश

नवीन रेल्वे स्टेशनला ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांचे नाव देण्याची मागणी

ठाणे–मुलुंडदरम्यान प्रस्तावित नव्या रेल्वे स्टेशनला दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे.ठाणे आणि मुलुंड या दरम्यान उभारण्यात येणारे हे नवीन रेल्वे स्टेशन लवकरच मार्गी लागणार असून, या स्टेशनला ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, असे मत त्यांनी मांडले.खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत मांडलेल्या या मागणीमुळे ठाणे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.दरम्यान, ठाणे–मुलुंडदरम्यानचे हे नवीन स्टेशन रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे. आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्यातील अत्यंत प्रभावशाली आणि जनमानसात रुजलेले नेते होते.शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात.त्यांनी ठाण्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिलेसर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असायचे,त्यांच्या कामाची शैली अत्यंत थेट, स्पष्ट आणि जनतेशी जोडलेली होती.“धर्मवीर” ही पदवी त्यांना त्यांच्या कार्यामुळेच मिळाली,ठाण्यातील अनेकांसाठी ते केवळ राजकारणी नव्हते,तर आधारवड आणि न्यायासाठी लढणारा नेता होते. ठाणे–मुलुंडदरम्यानचे हे नवीन रेल्वे स्टेशन वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता महत्त्वाचे ठरणार स्थानिकांना प्रवासात दिलासा देणार रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करणार,या मागणीमुळे ठाणे परिसरात पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.आता या प्रस्तावावर शासन आणि रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देश

“गंगा नदी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय; वाराणसीतील घटनेवर संताप”

वाराणसीत बोटवरील इफ्तार कार्यक्रमात गंगेत हाडे टाकल्याचा आरोप; १४ जण अटकेत वाराणसी येथे गंगा नदीवर आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार कार्यक्रमादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप समोर आला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्तींनी जेवणानंतर मांसाचे हाडे गंगा नदीत टाकल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रमजान महिन्यानिमित्त गंगा नदीत बोटीत इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान काही सहभागी व्यक्तींनी चिकन बिर्याणीचे सेवन केल्यानंतर त्यातील उरलेले हाडे नदीत फेकल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. गंगा नदीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारच्या कृतींमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली. तसेच, धार्मिक भावना भडकवणे किंवा दुखावणे हे कायद्याने दंडनीय कृत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित १४ जणांना ताब्यात घेतले. गंगेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारच्या कृत्यांमुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.दरम्यान, प्रशासनाने सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता आणि सामाजिक सौहार्द जपण्याचे आवाहन केले आहे.

देश

“धर्मवीर दिनानिमित्त वडू येथे दुचाकी रॅली; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन”

पुणे, दि. १८ मार्च २०२६ :फाल्गुन अमावास्या निमित्त “धर्मवीर दिन” साजरा करण्यात येत असून, Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी वडू येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर सकाळी ९.३० वाजता चिखली येथून वडू (बुद्रुक) येथे जाण्यासाठी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, तरुण आणि शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी फाल्गुन अमावास्येला “धर्मवीर दिन” पाळला जातो. मंदिरांचे आणि धर्मसंस्कृतीचे रक्षण करताना दिलेल्या त्यांच्या बलिदानाची आठवण यानिमित्ताने जागवली जाते.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये वडू परिसरात सकाळी ११.३० वाजता पूजाविधी तसेच अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. धर्म, संस्कृती आणि इतिहासाची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत असून, तरुणांमध्येही या उपक्रमांबाबत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे

Scroll to Top