
ठाणे–मुलुंडदरम्यान प्रस्तावित नव्या रेल्वे स्टेशनला दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे.
ठाणे आणि मुलुंड या दरम्यान उभारण्यात येणारे हे नवीन रेल्वे स्टेशन लवकरच मार्गी लागणार असून, या स्टेशनला ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, असे मत त्यांनी मांडले.
खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत मांडलेल्या या मागणीमुळे ठाणे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, ठाणे–मुलुंडदरम्यानचे हे नवीन स्टेशन रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे.
आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्यातील अत्यंत प्रभावशाली आणि जनमानसात रुजलेले नेते होते.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात.
त्यांनी ठाण्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले
सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असायचे,त्यांच्या कामाची शैली अत्यंत थेट, स्पष्ट आणि जनतेशी जोडलेली होती.“धर्मवीर” ही पदवी त्यांना त्यांच्या कार्यामुळेच मिळाली,ठाण्यातील अनेकांसाठी ते केवळ राजकारणी नव्हते,तर आधारवड आणि न्यायासाठी लढणारा नेता होते. ठाणे–मुलुंडदरम्यानचे हे नवीन रेल्वे स्टेशन वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता महत्त्वाचे ठरणार स्थानिकांना प्रवासात दिलासा देणार रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करणार,या मागणीमुळे ठाणे परिसरात पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.आता या प्रस्तावावर शासन आणि रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.