Sankalp Hindu Times

March 22, 2026

देश

‘शनिवार पेठेत ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न; हिंदू बांधवांचा मोठा प्रतिसाद’

पुणे: “जातिपातीच्या भिंती विसरून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असा सूर काल शनिवार पेठ येथे आयोजित ‘सकल हिंदू संमेलनात’ उमटला. मोतीबाग वस्तीतील हिंदू बांधवांच्या सक्रिय सहभागातून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शनिवारी, २१ मार्च रोजी अहिल्यादेवी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.​कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. प्रीतम जोशी सर यांनी भूषवले.यावेळी वस्तीचे संयोजक श्री . हेमंत मांडके यांचे नेटके नियोजन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. सांस्कृतिक सादरीकरण:संमेलनाची सुरुवात कलानंद नृत्य संस्थेच्या (ठाणे) वतीने सादर करण्यात आलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गणेशवंदनेने झाली.कलानंद संस्थेच्या सौ. पल्लवी लेले निपुणगे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला .त्यानंतर मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘चरैवेति चरैवेति’ ही प्रेरणादायी प्रस्तुती दिली.हे नृत्य शर्मिला कुलकर्णी , योगिता शिंदे , श्वेतांबरी बोध ह्या शिक्षिकांनी बसवले होते ; मुख्याध्यापक प्रसाद लागू सर ह्यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमातील प्रमुख टप्पे:​प्रबोधन: सौ. अपर्णा लेले यांनी ‘पंचपरिवर्तन’ विषयावर मांडलेले विचार आणि ह.भ.प. तेजश्री बाभूळगावकर यांनी दिलेले ‘आशीर्वचन’ यामुळे उपस्थित श्रोत्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. ​इतिहास आणि गौरव: संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर आधारित ‘यशोगाथा’ श्री. जगदीश कश्यप यांनी मांडली.​​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन मांडके यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केले.विक्रम सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या ‘सांघिक गीताने’ वातावरणात चैतन्य भरले.​शेवटी सौ. प्रतीक्षा कुलकर्णी यांनी गायलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली. या संमेलनाला मोतीबाग वस्तीतील नागरिक सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

ताज्या बातम्या, सोलापूर शहर

अक्कलकोट चे “चिकित्सक रत्न” हरपले ….

१७ जुलै १९३५ रोजी, अक्कलकोट शहरामध्ये डॉक्टर अरुण यशवंत परिचारक यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे अक्कलकोट आणि सोलापूर येथे पूर्ण करून वैद्यकीय शिक्षण पुणे इथे पूर्ण करून १९५७ पासून वैद्यकीय व्यवसाय अक्कलकोट येथे, केवळ गरीब आणि गरजू समाजाची अल्प  दरात निस्पृह सेवा करण्या साठी, सुरू केला. गरीबांचे डॉक्टर ही त्यांची खरी ओळख. आपला व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळून अतिशय तन्मयतेने त्यांनी समाज सेवाही केली. अक्कलकोट मध्ये स्वामी संगीत संसद स्थापून अनेक वर्षे चालवली या काळात त्यांच्या प्रयत्नाने अनेक नामवंत कलाकारांनी संसदेत हजेरी लावली. अक्कलकोट मध्ये लायन्स क्लब ची स्थापना करून या लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष केला. लायन्स पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा स्थापन केली. या शाळेचे चेअरमन म्हणून परिश्रमपूर्वक बरीच वर्षे काम करून शाळा नावारूपास आणली. अक्कलकोट एजुकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य आणि कॉलेज च्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणूनही अनेक दिवस सेवा केली. पुणे आणि शिवाजी विद्यापीठ येथे  बोर्ड ऑफ स्टडीजचे सभासद म्हणूनही काम पहिले. SSC- अक्कलकोट च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच व्याख्यानमाला आयोजित केली. महाराष्ट्र बोर्ड ऑफ आयुर्वेदिक मेडिसिनचे मानद सदस्य म्हणून ६ वर्षे काम केले नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या वैद्यकीय संघटनेचे कार्य महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष आणि सभासद म्हणून अनेक वर्षे केले. त्यात उल्लेखनीय म्हणजे निमा ची घटना आणि नियमावली बनवली. अक्कलकोट शहरात पहिले ब्लड डोनेशन शिबिरं, पोलिओ डोस, फ्री मेडिकल कॅम्पस , गरजू ना मोफत रुग्णसेवा , आरोग्यविषयक जनजागृती  इत्यादी अनेक कार्यक्रम केवळ समाज सेवा म्हणून राबवले. त्यांच्या या कामाची दखल , ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अँड एजुकेशनल ग्रोथ या संस्थेने घेऊन  त्यांना   ‘चिकित्सक रत्न’  या पदवीने भूषविले. त्याच प्रमाणे निमा ने ही ‘ निमा रत्न’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा आणि सेवेचा गौरव केला. लायन्स क्लबने ही वेळोवेळी त्यांचा गौरव केला आणि नुकताच चार्टर  मेंबर म्हणून सत्कार केला.   कै. डॉक्टर सरोजा, त्यांच्या दिवंगत पत्नी, अक्कलकोट शहरातील पहिल्या महिला डॉक्टर, यांचाही त्यांच्या या सेवेत १९५९ पासून तहहयात सक्रिय सहभाग होता.   त्यांच्या पश्चात् त्यांची कन्या डॉक्टर आसावरी विश्वजीत पेडगावकर त्यांचा वसा अक्कलकोट मध्ये  पुढे चालवित आहे. त्यांची जेष्ठ कन्या सौ. अनुराधा जयंत गबाळे Reserve बँकेतून निवृत्त होऊन ठाणे येथे स्थायिक आहे.    अशा या हरहुन्नरी, समाजसेवी, गरीबांच्या डॉक्टरांचे आणि  “अक्कलकोट भूषण” वयाच्या ९० व्या वर्षी  दिनांक १३ मार्च २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

Scroll to Top