
पुणे: “जातिपातीच्या भिंती विसरून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असा सूर काल शनिवार पेठ येथे आयोजित ‘सकल हिंदू संमेलनात’ उमटला. मोतीबाग वस्तीतील हिंदू बांधवांच्या सक्रिय सहभागातून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शनिवारी, २१ मार्च रोजी अहिल्यादेवी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. प्रीतम जोशी सर यांनी भूषवले.
यावेळी वस्तीचे संयोजक श्री . हेमंत मांडके यांचे नेटके नियोजन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
सांस्कृतिक सादरीकरण:
संमेलनाची सुरुवात कलानंद नृत्य संस्थेच्या (ठाणे) वतीने सादर करण्यात आलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गणेशवंदनेने झाली.कलानंद संस्थेच्या सौ. पल्लवी लेले निपुणगे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला .
त्यानंतर मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘चरैवेति चरैवेति’ ही प्रेरणादायी प्रस्तुती दिली.
हे नृत्य शर्मिला कुलकर्णी , योगिता शिंदे , श्वेतांबरी बोध ह्या शिक्षिकांनी बसवले होते ; मुख्याध्यापक प्रसाद लागू सर ह्यांचे मार्गदर्शन लाभले

कार्यक्रमातील प्रमुख टप्पे:
प्रबोधन: सौ. अपर्णा लेले यांनी ‘पंचपरिवर्तन’ विषयावर मांडलेले विचार आणि ह.भ.प. तेजश्री बाभूळगावकर यांनी दिलेले ‘आशीर्वचन’ यामुळे उपस्थित श्रोत्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
इतिहास आणि गौरव: संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर आधारित ‘यशोगाथा’ श्री. जगदीश कश्यप यांनी मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन मांडके यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केले.
विक्रम सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या ‘सांघिक गीताने’ वातावरणात चैतन्य भरले.
शेवटी सौ. प्रतीक्षा कुलकर्णी यांनी गायलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली. या संमेलनाला मोतीबाग वस्तीतील नागरिक सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
