Sankalp Hindu Times

‘शिवराज दिना’निमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रसंगाची आठवण म्हणून ‘शिवराज दिन’ पुण्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हिंदू महिला सभेच्या वतीने हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम लाल महाल, पुणे येथे बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पार पडणार आहे. शिवकालीन इतिहासातील शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम असलेल्या शाहिस्तेखानाच्या बोटे कापण्याच्या प्रसंगाच्या स्मरणार्थ हा दिवस ‘शिवराज दिन’ म्हणून साजरा केला जातो.


कार्यक्रमामध्ये ‘कथा शिवरायांची’ या विषयावर आधारित देखणा सांस्कृतिक सादरीकरण करण्यात येणार असून, शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांद्वारे उपस्थितांना इतिहासाची उजळणी घडवली जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नव्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांचे पराक्रम, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याची भावना पोहोचवणे हा आहे.
आयोजकांच्या वतीने सर्व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवकार्याची प्रेरणा घेऊन हिंदुराष्ट्र अधिक समर्थ बनवण्याचा संदेश यावेळी देण्यात येणार आहे.

Scroll to Top