९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार उपस्थित होते. संमेलनात देशभरातील मराठी साहित्यिक, संशोधक आणि मराठी भाषा प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन विशेष महत्वाचे ठरले.