
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने फाल्गुण कृष्ण तृतीया, शके १९४७, शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी “शिवजन्मोत्सव सोहळा” मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध युवा शिवव्याख्याते मा. श्री. सर्वेशजी मेहेंदळे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. “शिवचरित्र – शिवराय म्हणजे संकल्प, समर्पण, बलिदान, शौर्य आणि स्वाभिमानाचा रोमांचकारी इतिहास” या विषयावर त्यांनी प्रभावी भाषण केले. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थित शेकडो शिवभक्त भारावून गेले. कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
यावेळी स्वस्तिक सोशल फाउंडेशन संचलित गोशाळेसाठी निधी देऊन सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. कार्यक्रमास प्रभाग क्रमांक २५ मधील नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर, सौ. स्वप्नाली पंडित तसेच सौ. स्वरदाताई बापट आणि कसबा अध्यक्ष अमितजी कंक उपस्थित होते.
तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप कसबे यांनी मंडळाला भेट देऊन मंडळाच्या सामाजिक व सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
वक्ता परिचय राधेय डिंगरे यांनी करून दिला. तसेच मंडळाचे कुणाल आहेर, संदीप उभे, सुनील मोहिते, प्रणित शिंदे व निखिल हजारे यांनी शिवव्याख्याते सर्वेशजी मेहेंदळे यांचा शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व फळांची टोकरी देऊन सत्कार करण्यात आला.
शिवजयंती निमित्त मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मा. नगरसेवक राजेशजी येनपुरे, उद्योजक विनोद शेठ साखला, विशालजी आढाव, रोहितजी महाजन व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी राधिका डिंगरे, वेदांत सुतार, अंशुल मोहिते, देवेश गायकवाड, श्रेयस डिंगरे व इतर बाल कार्यकर्त्यांनी लाठी-काठी खेळ तसेच पोवाडा सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक उभे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुदत्त डिंगरे यांनी केले.अजित परांजपे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संयुक्त प्रसाद मित्र मंडळ या नारायण पेठ, पुणे व कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
