ICC Men’s T20 World Cup 2026 Final मध्ये भारताने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा तब्बल 96 धावांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरले.
भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 255 धावा करत प्रचंड मोठा स्कोअर उभा केला. या डावात Sanju Samson याने तुफानी फलंदाजी करत 89 धावा केल्या आणि भारताच्या डावाला मजबूत आधार दिला. त्याला Abhishek Sharma (52) आणि Ishan Kishan (54) यांनीही दमदार साथ दिली.
256 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. संपूर्ण संघ 159 धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला.
भारत हा असा एकमेव संघ आहे ज्याने आपले गत विजयते पद राखून ठेवले आहे