Sankalp Hindu Times

पुण्यात ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न

पुणे : मोती गणपती वस्ती, नारायण पेठ येथे आयोजित ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले. समस्त हिंदू समाजाने एकत्र येऊन संस्कृती, इतिहास आणि परंपरांचा अभिमान जागवण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.

या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. समाजातील एकोपा, जातीय भेदभाव दूर करून एकत्र येण्याची गरज यावर वक्त्यांनी भर दिला.

संमेलनात ह.भ.प. जयंत गोसावी यांचे प्रेरणादायी आशीर्वचन झाले. तसेच श्री. दिनेश कंक (संस्कृती जागरण मंडळाचे ट्रस्टी) यांनी ‘संघ शताब्दी यशोगाथा’ या विषयावर मार्गदर्शन केले. सौ. आभा करंदीकर (इंटेरिअर डिझायनर व ज्योतिष विशारद) यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर विचार मांडले.

कार्यक्रमात ‘नटरंग अकादमी’कडून सादर करण्यात आलेल्या शास्त्रीय नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली आणि संमेलनाला सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली.

लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू संमेलन समिती, मोती गणपती वस्ती यांच्या वतीने करण्यात आले होते.

Scroll to Top