Sankalp Hindu Times

Author name: sankalphindutimes.com

sankalphindutimes.com
पंचनामा २०२६

नवी मातोश्री पैसा कसा फिरवते ?

-प्रसाद काथे मातोश्री या बंगल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात आदर आहे तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. स्थानीय लोकाधिकार समितीतून भूमिपुत्राच्या पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या बाळासाहेबांचे हे घर त्यासाठीच एकेकाळी आदरस्थान राहिले. मात्र, २००२ च्या मुंबई मनपा निवडणुकीत पुढची पिढी सक्रीय झाली आणि मातोश्रीबाबतच्या आदराची जागा व्यवहाराने घेतली. मातोश्री हा बंगला कुठे आहे? हे कुणाला वेगळं सांगायची गरज नाही. तसेच या बंगल्यात पूर्वी कोण राहात होते आणि आता कोण राहते ते ही आपल्याला पुरते ठाऊक आहे. मात्र, या सगळ्यात आजवर कुणालाही जे ठाऊक नाही ते म्हणजे या मातोश्रीचा खर्च कसा चालतो ? इथे रेशन कोण भरते ? आणि या बंगल्याबाहेरच्या गाड्यांमध्ये इंधन कोण भरते ? दस्तूरखुद्द भास्कर जाधव यांनी या आशयाचे प्रश्न सर्वप्रथम विचारून महाराष्ट्राला चक्रवून सोडले होते. चोवीस तास खडा पहारा असलेली ही वास्तू सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. त्यामुळे, या वास्तूच्या रहिवाशांबद्दल राज्यात कायम उत्सुकता आहे. या वास्तूमध्ये राहणारे जर का सामान्य नागरिक असते तर, हा लेखन प्रपंच झालाच नसता. बाळासाहेब दिलदार होते. टीका मर्दासारखी अंगावर घ्यायचे. आताचे मातोश्रीवासी खुनशी आहेत. हा लेख लिहिणाऱ्यावर काहीही करून हल्ला चढवायचा ते प्रयत्न नक्की करतील. असो. या बंगल्यातून केल्या जाणाऱ्या घोषणा आणि दिले गेलेले आदेश यामुळे मुंबई, महाराष्ट्र आणि प्रसंगी देशाचे नागरिक भरडलेले आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या बंगल्यात राहणाऱ्यांनी स्वतःला परोक्ष आणि अपरोक्षपणे लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कक्षेत आणले आहे. तसेच, मुंबईच्या अस्मितेचे आणि मराठी माणसाच्या हितरक्षणाचे दावे करणारे सध्या इथेच राहतात. या सर्व बाबी सार्वजनिक असताना आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. मातोश्रीवाल्यांनी मराठी माणसाला खोटी स्वप्न दाखवून मुंबई लुटून खाल्ली असा दावा स्वतः राज श्रीकांत ठाकरे यांनीच केलाय. हा दावा खरा वाटू शकतो. कारण, जी आलिशान जीवन पद्धती मातोश्रीवाले जगतात त्यामागे नियमित उत्पन्नाचा निश्चित आणि सार्वजनिक स्रोत अगदी अलीकडे कुणाला ठाऊक नव्हता. शिवसेना प्रमुख हयात होते तोवर ही माहिती मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. किंबहुना लोकांना त्याची गरज नव्हती. कारण, बाळासाहेब यांचे वागणे तसे असायचे. मात्र, त्यांच्या वंशजांनी निवडणूक लढताना दिलेली प्रतिज्ञापत्र जी माहिती सार्वजनिक करतायत ती केवळ आश्चर्यकारक नव्हे तर, डोळे विस्फारणारी आहे. याचमुळे, मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या मुदत ठेवी आणि हजारो कोटींची दरवर्षीची मुंबई मनपाच्या अर्थसंकल्पात होणारी उलाढाल यावर एकछत्री अंमल ठेवणारे सध्याचे मातोश्रीवाले वाममार्गाने संपत्ती तर मिळवत नाहीत ना ? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच मातोश्रीच्या उत्पन्नाचा ज्ञात आणि अज्ञात स्रोत शोधण्याचा हा प्रयत्न. हा लेख तुम्ही संपूर्ण वाचायला हवा. कारण, या लेखात तुम्हाला मातोश्रीवासियांच्या उत्पनाचे स्रोत सार्वजनिक करणारा बिभीषण कोण? हे ही तुम्हाला कळेल. आता मातोश्री निवासी असलेले दादू, वहिनी आणि आदू यांच्या बाबतचा सार्वजनिक तपशील काय सांगतो ते आधी लक्षात घ्या. आदूकडे स्वतःच्या मालकीची गाडी आहे. कोणती ? तर २०१० मध्ये नोंदवलेली आणि २०१९ मध्ये विकत घेतलेली MH-02-CB-1234 क्रमांकाची बीएमडब्ल्यू. वर्ष २०१९मध्ये खरेदी केलेल्या बीएमडब्ल्यूचे घोषित विमा मूल्य फक्त साडेसहा लाख रुपये असल्याचे सांगितले गेले आहे. साडेसहा लाखाची बीएमडब्ल्यू असते ? ते कसे हे कुणी शहाणा माणूस सांगू शकेल का? आदूच्या बाबतीत या पलीकडेही काही बाबी आहेत ज्यामुळे, भुवया उंचावतील. आदूच्याकडे २०२४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार ३७ हजार ३४४ रुपये रोख आहेत. तर, शेअर, डिबेंचर्स आदी गुंतवणुकीचे घोषित मूल्य २०१९ मध्ये २० लाख ३९ हजार १२ रुपये होते जे पाच वर्षात १० कोटी १४ लाख ९८ हजार ५२ रुपये झाले आहेत. दागदागिने म्हणून आदूकडे २०१९ मध्ये ६४ लाख ६५ हजार ७४ रुपये मूल्याच्या वस्तू होत्या. तर, २०२४ मध्ये हाच मुद्देमाल १ कोटी ९१ लाख ७ हजार १५९ रुपये मूल्याचा झाला. आदूकडे २०१९ला बँकेत १० कोटी ३६ लाख १५ हजार २१८ रुपये होते ते २०२४ मध्ये ते २ कोटी ८१ लाख २० हजार ७२३ झाले आहेत. एकुणात पाहिले तर, वर्ष २०२४ मध्ये आदूच्या नावे १५ कोटी ४३ लाख ३ हजार ६० रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. याशिवाय हिंदू अविभक्त कुटुंबाच्या खात्यावर १ कोटी ९६ लाख १५ हजार ६६८ रुपयांची मालमत्ता आहे. याव्यतिरिक्त आदूच्या नावे ६ कोटी ४ लाख ५१ हजार ३५० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. आदू हा त्याच्या वडिलांवर अवलंबून नाही. त्यामुळे, इतकी संपत्ती बाळगणारा आदू काम काय करतो? हा प्रश्न कुणालाही पडेल. आदू नंतर दादूबाबत माहिती बघूया. दादूकडे स्वत:च्या मालकीची गाडी नाही. दादूकडून २०२० मध्ये प्रतिज्ञापत्र देऊन घोषित केलेली संपत्ती वाचून तुमचेही डोळे विस्फारातील. दादूकडे २०२० च्या प्रतिज्ञापत्रानुसार, ७६ हजार ९२२ रुपये रोख तसेच बँकेत १ कोटी ६० लाख ९३ हजार ६७५ रुपये होते. दादूच्या शेअर, डिबेंचर्स आदी गुंतवणुकीचे घोषित मूल्य २०२० मध्ये २१ कोटी ६८ लाख ५१ हजार १ रुपये इतके होते. तर, २०२० मध्ये दादूकडे २३ लाख २० हजार ७३६ रुपये मूल्याच्या दागिन्याची मालमत्ता आहे. एकुणात पाहिले तर, वर्ष २०२० मध्ये दादूच्या नावे २४ कोटी १४ लाख ९९ हजार ५९३ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहेयाशिवाय हिंदू अविभक्त कुटुंबाच्या खात्यावर १ कोटी ५८ लाख १४ हजार ३९५ रुपयांची मालमत्ता आहे. याव्यतिरिक्त दादूच्या नावे ५८ कोटी ८५ लाख ११ हजार ८७४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर, १४ कोटी ५० लाख ८५ हजार७२२ रुपयांची स्थावर मालमता दादूला वंशपरंपरेने मिळाली आहे. इतकी संपत्ती बाळगणारा दादू बालमोहन शाळेतून १९७६ला दहावी आणि १९८६ ला सर जे जे कला विद्यालयातून पदविका प्राप्त व्यक्ती असून एडीआर वेबसाईट सांगते की, दादूचा २०२०ला घोषित पेशा नोकरी होता. नोकरी करणारा मराठी माणूस इतकी संपत्ती कशी उभी करतो हे कोडं कसं सोडवायचं ? आदू आणि दादूच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका आहे वहिनींची. दादूसोबत प्रेमाविवाह झाल्याने डोंबिवलीतून मातोश्रीत आलेल्या वहिनींची जंगम मालमत्ता आहे ३६ कोटी १६ लाख ४३ हजार ४५५ रुपये. विशेष म्हणजे जंगम मालमत्तेत वहिनींकडे १ कोटी ३५ लाख २० हजार ९२९ रुपयांचे तर फक्त दागदागिने आहेत. वहिनींकडेही बरीच स्थावर मालमत्ता आहे. त्याची वर्ष २०२० मध्ये घोषित किंमत आहे ४८ कोटी ९३ लाख ९ हजार १९१ रुपये. दादू आणि वहिनींच्या संपत्तीतली मजेशीर बाब तुम्हाला ठाऊक आहे? दादूने १० कोटी १६ लाख ५६ हजार ६०० रुपयांची प्रॉपर्टी स्वतः कमावली आहे. तर, वहिनींनी १२ कोटी ९९ लाख ५४ हजार २१० रुपयांची प्रॉपर्टी स्वतः कमावलेली आहे. तसेच, दादूने स्वतः घेतलेले ऍसेट्स आहेत ३७ कोटी ९३ लाख ७२ हजार २६२ रुपयांचे. तर, वहिनींनी २८ कोटी ९२ लाख ५९ हजार ३३६ रुपयांचे ऍसेट्स स्वतः घेतलेले आहेत. वहिनींच्या उत्पन्नाचा स्रोत काय ते जाहीर नाही. त्यांचे शिक्षण काय? जाहीर नाही. तरीही इतकी संपत्ती त्यांच्या नावे आहे आणि त्यातला काही हिस्सा त्यांनी स्व उत्पन्नातून कमावलाय हा तपशील दादूनेच स्वतः घोषित केलाय. मातोश्रीच्या या तिघांच्याही नियमित उत्पन्नाचा निश्चित आणि सार्वजनिक स्रोत जरी माहीत झाला तरी इतकी करोडोंची संपत्ती काही दशकात कशी कमवता येते हे मराठी माणसांना कळू शकेल. पण, तसे होणार नाही. या मातोश्रीवासियांचा सर्वपरिचित एकच धंदा आहे. तो म्हणजे प्रबोधन प्रकाशन. त्या प्रकाशनाकडून काही

क्रीडा, ताज्या बातम्या, देश, महाराष्ट्र

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराड शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषण केली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराड शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषण केली आहे. त्यांनी सांगितले की, शासकीय योजना प्रभावीपणे राबवून, कराडला पाच वर्षांच्या आत एक आदर्श आणि सर्वोत्तम शहर बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले जाईल. यामध्ये शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यावर विशेष भर दिला जाईल, तसेच नागरिकांसाठी सुविधांचा विस्तार केला जाईल. बावनकुळे यांनी कराडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्याने कार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना कसा मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा विश्वास आहे की योग्य मार्गदर्शन आणि योग्य योजना राबवून कराडला एक आदर्श शहर बनवता येईल.

देश

विराट कोहलीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे

विराट कोहलीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे. त्याने २०२३ मध्ये सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आणि नंतर ५० शतकांचा टप्पा पार केला. कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप सोडताना अवघ्या १७ व्या वर्षी पदार्पण केले होते. त्याच्या कारकिर्दीत अनेक संघर्ष आणि आव्हाने आली, पण त्याने त्याला संधी म्हणून स्वीकारले आणि प्रत्येक टप्प्यावर आपली मेहनत आणि कौशल्य दाखवले. कोहलीचा आक्रमक खेळ, तंत्रज्ञानातील निपुणता आणि फिटनेसच्या बाबतीत जागरूकता यामुळे तो आधुनिक क्रिकेटमध्ये एक उदाहरण बनला आहे. त्याच्या यशामागे त्याच्या समर्पणाची आणि परिश्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आज, विराट कोहली क्रिकेट जगतातील एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो, ज्याने सचिन तेंडुलकरच्या अनेक विक्रमांना मागे टाकले आहे.

आंतरराष्ट्रीय, ताज्या बातम्या, देश, धर्म, महाराष्ट्र

दिल्ली मराठी साहित्य संमेलन

९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार उपस्थित होते. संमेलनात देशभरातील मराठी साहित्यिक, संशोधक आणि मराठी भाषा प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन विशेष महत्वाचे ठरले.

Scroll to Top