संकल्प हिंदू टाइम्स

27th July 2024

अयोध्येत पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक ; भाविकांना आवरताना पोलिसांची दमछाक, काहीकाळ दर्शन थांबविले

तुमच्या मित्रांना शेअर करा

अयोध्येत सोमवारी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी मंगळवारी भाविकांसाठी राममंदिर खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले आणि तितकेच भाविक मंदिर परिसरात दर्शनाच्या प्रतिक्षेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या गर्दीला आवरताना पोलिसांची बरीच दमछाक झाली आणि त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने अयोध्या दौरा करत स्थितीचा आढावा घेतला.

रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी राममंदिराबाहेर सोमवारी मध्यरात्रीपासूनच दर्शनाच्या रांगा लागल्या होत्या. कडाक्याच्या थंडीतही हातात ‘राम ध्वज’ घेतलेले आणि रामनामाचा घोष करणारे हजारो भाविक रांगेमध्ये उभे होते. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारपर्यंत अडीच ते तीन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. सर्वसामान्य नागरिकांसाठी मंगळवारी पहाटेपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.