संकल्प हिंदू टाइम्स

13th June 2024

आता बॉलीवूडवर शिंदे-फडणवीस सरकार नियंत्रण आणणार; लवकरच SOP होणार लागू

तुमच्या मित्रांना शेअर करा

चित्रपट सृष्टीसह मनोरंजन क्षेत्रामधील निर्माते व कलाकारांच्या मनमानीला आता शिंदे फडणवीस सरकार लगाम लावणार आहे. कारण चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकार आणि कामगारांसहित निर्माते व दिग्दर्शक यांसाठी एक नवीन नियमावली सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कलाकार व कामगारांचे वेतन कायद्यानुसार द्यावे लागणार असून ते न देणाऱ्या निर्माते व कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. बॉलीवूडवर शिंदे-फडणवीस सरकार नियंत्रण आणणार आहे. बॉलीवूड मधील कामगार, कलाकार व निर्मात्यांसाठी नवीन नियमावली (एसओपी) तयार करण्यात येणार आहे. चित्रपट निर्मात्यांवर कामगार व कलाकारांची जबाबदारी असेल. चित्रपट, सिरीयल, जाहिराती आणि वेब सिरीज यांना एसओपी लागू करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील कामगार व कलाकारांचे शोषण थांबवण्यासाठी एसओपी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याचे बंधनकारक असेल. आपले सरकार पोर्टलसह तक्रार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. महिला कामगारांना घरपोच वाहतूक व्यवस्था पुरवण्याचे आदेशही यात आहेत.