संकल्प हिंदू टाइम्स

14th June 2024

तेव्हा उद्धव ठाकरेंनी घाई केली नसती तर आज ‘हे’ चित्र नसतं; भूजबळांचं मोठं विधान

तुमच्या मित्रांना शेअर करा

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी आज उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत मोठं विधान केलं आहे. तेव्हा त्यांनी घाई केली नसती तर आज वेगळं चित्र राहिलं असतं ते म्हणाले. छगन भूजबळ म्हणाले की, सध्या राज्यभरातून उद्धव ठाकरे यांच्यामागे सहानुभूती आहे. त्यामुळे त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळेल. परंतु सत्तासंघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंनी घाई केली नसती तर आज परिस्थिती वेगळी असती. परंतु जर आणि तरला काहीही अर्थ नाही. मतदार ठाकरेंसोबत आहेत, असा विश्वास भूजबळांनी व्यक्त केला.