संकल्प हिंदू टाइम्स

15th June 2024

पालकमंत्री चंद्रकांत दादांचा प्रजासत्ताक दिनी हटके लूक..

तुमच्या मित्रांना शेअर करा

सोलापूर : देशाच्या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शासकीय ध्वजारोहण करण्याची संधी क्वचितच राजकारण्यांना मिळते. ज्यांना मिळते ते त्या दिवशी कडक ड्रेस घालून जरीचा फेटा बांधून कार्यक्रमाला उपस्थित राहतात. परंतु असे बरेच बोटावर मोजण्याइतके नेते आहेत की ते अतिशय साधे आणि सिंपल राहतात, साधी राहणी उच्च विचारसरणी असे नेते कमीच आहेत.

त्यापैकी एक म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील. त्याच राहणीमान अतिशय साधं असतं. ते सोलापूरचे पालकमंत्री झाले. त्यांच्या हस्ते 2024 सालच्या प्रजासत्ताक दिनाचे शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी दादांनी पांढरा सदरा, पांढरं धोतर आणि गुलाबी सिंपल फेटा बांधला होता. त्यांचा तो लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.