संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

मुलाचं धाडस पाहून सगळेच जण झाले शॉक

तुमच्या मित्रांना शेअर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान मुलगा एका मगरीसोबत फिरताना दिसतोय. या मुलानं मगरीच्या पिल्लाला आपल्या पाठीवर घेतलेय. आणि एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे फिरवताना दिसतोय. आश्चर्याची बाब म्हणजे मगरीशी मैत्री करणं काही सोपं काम नाही. त्यात हे पिल्लू आहे. मगर आपल्या पिल्लांना एकटं सोडत नाही. याचा अर्थ आईच्या डोळ्यांसमोरून या मुलानं पिल्लाला उचलून आणलंय. म्हणजे त्या मुलानं मगरीच्या आईसोबत सुद्धा मैत्री केली असणार. पण या मुलानं मगरींशी मैत्री केली तरी कशी? त्याचं वय पाहाता त्यानं मगरींच्या जवळ जाण्यासाठी प्राणी तज्ज्ञांप्रमाणे कुठलंही शास्त्रीय शिक्षण घेतलेलं नाही असं दिसतंय.