संकल्प हिंदू टाइम्स

4th November 2024

रामरथयात्रेसह अनेक संघर्ष आज सुफळ संपूर्ण झाले….! लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न जाहीर.

तुमच्या मित्रांना शेअर करा

आडवाणी यांचा जीवन परिचय – आठ नोव्हेंबर 1927 मध्ये कराची मध्ये अडवाणी यांचा जन्म झाला त्यांचे वडील के.डी अडवाणी आणि आई ज्ञानी अडवाणी. त्यांच्या पत्नीचे नाव कमला, त्यांना दोन आपत्य आहेत जयंत आणि प्रतिभा.

त्यांचे शालेय शिक्षण लाहोर मध्ये झाले. भारताची फाळणी झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यास सुरुवात केली.

BJP पक्ष वाढवण्यात आणि त्याची जडणघडण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते… लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर होताच प्रधानमंत्री यांनी त्यांना कॉल करून शुभेच्छा दिल्या.

अडवाणी हे भारताचे सातवे उपपंतप्रधान मंत्री होते.
1970 ते 1989 पर्यंत ते चार वेळा राज्यसभा सदस्य होते.
1973 मध्ये जनसंघाचे अध्यक्ष पदावर ते रुजू झाले होते.
1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये त्यांनी सूचना प्रसारण मंत्री हे पद भूषवले होते.
आणीबाणीच्या काळात मीडियावर सेन्सर शीप लावून अनेक बंधने लादली होती. त्या काळात मीडियाच्या विरोधातील कायदे त्यांनी उठवले आणि मीडियाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी नवीन कायदे प्रस्थापित केले.

श्रीराम रथ यात्रा 25 सप्टेंबर 1990 मध्ये प्रारंभ झाली.

राम रथयात्रेचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांनी केले. ही एक राजकीय आणि धार्मिक यात्रा होती. पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर 22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्या येथे रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापना झाली यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांचे योगदान अमूल्य आहे.

जीवनाच्या उत्तरार्धात त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला. लवकरच याची देही याची डोळा त्यांना या सुवर्णक्षणांची अनुभूती घेता येईल यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे व भारत सरकारचे हार्दिक आणि मनःपूर्वक अभिनंदन. जय श्रीराम!