संकल्प हिंदू टाइम्स

30th September 2024

रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे का…? असेल तर जाणून घ्या दर्शनाची अचूक वेळ…!

तुमच्या मित्रांना शेअर करा

अयोध्येमध्ये मागील काही दिवसांपासून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. त्यामुळे, एक वेगळाच उत्साह अयोध्येत पहायला मिळाला. २२ जानेवारीला सोमवारी अयोध्येतील नवीन मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या अधिकृत वेबसाईटनुसार भाविक श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी सकाळी ७ ते ११:३०  पर्यंत येऊ शकतात. त्यानंतर, दुपारी २ ते ७ या वेळेत सायंकाळच्या दर्शनासाठी भाविकांना मुभा असेल.

रामलल्लाच्या दर्शनासोबतच तुम्ही प्रभू श्रीरामांच्या सकाळी आणि संध्याकाळी पार पडणाऱ्या आरतीमध्ये ही सहभागी होऊ शकता. पंरतु, यासाठी तुम्हाला पासेस बूक करावे लागतील. प्रभू श्रीरामांच्या आरतीसाठी मिळणारे पासेस मोफत आहेत. त्यासाठी, तुम्हाला आधी बुकिंग करून पास घ्यावा लागेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही या पासेसचे बुकिंग करू शकता आणि रमलल्लाचे मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या दर्शनाचा लाभ घेऊ शकता…जय श्रीराम