संकल्प हिंदू टाइम्स

14th June 2024

संकल्प हिंदू टाइम्स च्या पुणे आवृत्तीचे मंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

तुमच्या मित्रांना शेअर करा

लेखा जोखा महाराष्ट्राचा – याविषयावर सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न.

पुणे : संकल्प हिंदू टाइम्स साप्ताहिकाच्या पुणे आवृत्तीचे प्रकाशन कोथरूड येथील आशिष गार्डन सभागृहात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले,तसेच साप्ताहिकाच्या उदघाटनानिमित्त संकल्प हिंदू टाइम्स व क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “लेखाजोखा महाराष्ट्राचा” या विषयावर एनालायजर चे प्रसिद्ध युट्युबर श्री.सुशील कुलकर्णी यांचे दणदणीत व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संदीप खर्डेकर,संकल्प हिंदू टाईम्स चे संस्थापक संपादक श्री अनिकेत कुलकर्णी,पुणे आवृत्तीचे संपादक श्री विश्वजीत देशपांडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संदीप खर्डेकर म्हणाले, हिंदुत्वनिष्ठांच्या कार्यात आमचे फाउंडेशन सतत सक्रिय असते त्यामुळेच संकल्प हिंदू टाईम्स च्या उद्घाटनात आम्ही सक्रिय सहभाग नोंदवत आहोत आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की जे काही चांगल आहे ते समाजापर्यंत पोहोचले पाहिजे.

संकल्प हिंदू टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे संपादक श्री विश्वजीत देशपांडे म्हणाले, माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते संकल्प हिंदू टाईम च्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांचा जागर करण्याची ही सुरुवात आहे या राष्ट्रीय यज्ञात आमची समिधा अर्पण करून राष्ट्रसेवेचा प्रयत्न असणार आहे. संकल्प हिंदू टाइम्स प्रिंट व डिजिटल दोन्ही स्वरूपात वाचकांच्या भेटीस येणार आहे.

महाराष्ट्राचा लेखाजोखा मांडताना श्री सुशील कुलकर्णी म्हणाले, आपला भारत देश गेल्या दहा वर्षात नवीन स्थित्यंतर अनुभवत आहे भारताची प्रतिमा जगभरात उज्वल झालेली आहे नरेंद्र मोदी नावाचे गारुड भारतीयांच्या मनावर स्वार झालेले आहे देशभरात सकारात्मक ऊर्जा तयार झाल्याने त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रात दिसत आहेत, नागरिकांनी मत देताना जाती पातीच्या आधारावर मतदान न करता राष्ट्राचा विचार करून मतदान केले पाहिजे.

मा.ना.चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, आपला देश व महाराष्ट्र प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठत आहे त्याला खीळ घालण्यासाठी काही विचारसरणी चे लोक सतत नकारात्मक प्रचार करण्यात गुंतलेल्या आहेत त्यांना उत्तरे देण्यासाठी अधिकाधिक राष्ट्रीय विचारांनी प्रभावित माध्यमांची खूप आवश्यकता आहे म्हणून संकल्प हिंदू टाइम्स ला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आहेत उत्तरोत्तर आपण प्रगती करत राष्ट्रकार्यात उत्तम ठसा उमटवावा.

यावेळी भाजपा चे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, कोथरूड मंडल सरचिटणीस व महिला आघाडी प्रभारी मंजुश्री खर्डेकर, मा. नगरसेवक राजेश येनपुरे, दीपक पोटे, सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, शिवराम मेंगडे, किरण दगडे,आरतीताई कोंढरे, प्रसन्नदादा जगताप,अल्पनाताई वर्पे, श्रद्धाताई प्रभुणे,कांचनताई कुंबरे, अमित तोरडमल,नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू, देवदेवेश्वर संस्थान चे अध्यक्ष रमेश भागवत,पतित पावन संघटनेचे मनोज नायर, गोकुळ शेलार, सर्वशाखीय ब्राह्मण संघाचे राजीव जोशी, प्रमोद जोशी, प्रकाश हडप, ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर तसेच शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सोहळ्यास उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री उपेंद्र जपे ऋषिकेश सुमंत स्वप्निल कुलकर्णी सागर मांडके शैलेश खोपटीकर धीरज जोशी लक्ष्मी कुलकर्णी मृणाल ईनामदार अपर्णा वैद्य आदींनी परिश्रम केले.