संकल्प हिंदू टाइम्स

21st December 2024

मामांना महाराष्ट्र भूषण : जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर

तुमच्या मित्रांना शेअर करा

महाराष्ट्राचे लाडके अभिनेते मराठी व हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या सिनेविश्वातील उत्तुंग योगदानासाठी महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार “महाराष्ट्र भूषण” जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.