छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी घेत असत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातील चिंतामणीचा कौल
तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता मंदिरात चिंतामणी सुकनावतीचे मंदिर आहे. चिंतामणी म्हणजे गणपती जो भक्तांची चिंता हरतो… आणि चिंतामणीच्या बाजूला देवी सुकनवती आहे… मंदिरामध्ये स्थित असलेला दगड हा त्रेतायुगा पासून अस्तित्वात असल्याची अख्यायिका आहे… हे चिंतामणी सुकनाकीचे मंदिर छत्रपती शिवाजी राजद्वारा समोर आहे….
तेथील मानकरी – पुजारी यांचे असे म्हणणे आहे की छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही मोहिमेस जात असताना तसेच त्यांच्या मनात असलेल्या इच्छा या चिंतामणी सांगून कौल असत… अशी माहिती तेथील मानकरी (गोपाळ चांडूफळे आणि सचिन) यांनी दिली
चिंतामणी उजव्या बाजूस फिरल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होणार डाव्या बाजूस फिरल्यास इच्छा पूर्ण होणार नाही आणि स्थिर राहिल्यास प्रयत्नाने इच्छा पूर्णत्वाला येईल असे येथील पुजारी म्हणाले….
चला तर मग पाहूया गोपाळ चांडूफळे यांच्यासोबत ची मुलाखत….