जाणून घ्या रमलाल्लांच्या आलंकाराची माहिती… रत्नालंकार भूषण शोभे राम राजीवलोचन
अयोध्येमधील राममंदिरातील राममूर्तीची आभूषणे रामलल्लाच्या सौंदर्यामध्ये आणखी भर घालत आहे. रामलल्लाचे रूप अपादमस्तक खुलविणाऱ्या या आभूषणांची माहिती.
रामलल्लाचे मुकुट हे २२ कॅरेट सोन्याचे असून त्याचे वजन एक किलो ७०० ग्रॅम आहे. या मुकुटावर ७५ कॅरेटचे हिरे असून १३५ कॅरेटचे पाचू आणि २६२ कॅरेटची माणके जडवलेली आहेत. या मुकुटाची शैली उत्तर भारतीय पद्धतीची असून त्यावर मध्यभागी भगवान सूर्य नारायणांची प्रतिमा साकारलेली आहे.