संकल्प हिंदू टाइम्स

16th November 2024

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिंदे गटाचा कोर्टात मोठा दावा, उद्धव ठाकरेंच्या खेळीवर ठेवले बोट

तुमच्या मित्रांना शेअर करा

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : शिवसेना कुणाची? या प्रश्नाचा निकाल कधी लागले याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून ख्यातनाम वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली आहे.  उद्धव ठाकरेंनीच परिस्थिती ओळखून राजीनामा दिला. बंडखोर 16 आमदारांमुळे सरकार पडलेले नाही, असा दावा साळवे यांनी केला. यात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अॅड. कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण, पक्षांतर बंदी कायदा याबाबत सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर फेरविचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. शिंदे गटाची बाजू अॅड. हरीश साळवे मांडत आहे.  सुनावणीसाठी ते लंडन येथून ऑनलाईन हजर झाले आहेत.