संकल्प हिंदू टाइम्स

15th June 2024

Aditya Roy Kapoor : आदित्य तरुणींच्या गराड्यात सापडला! तरुणींनी त्याच्या….

तुमच्या मित्रांना शेअर करा

Aditya Roy Kapur Kissing Video Viral : ज्यांनी आशिकी २ पाहिला असेल त्यांना आदित्य रॉय कपूर कोण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आपल्या वेगळ्या शैलीच्या अभिनयानं त्यानं लाखो चाहत्यांना वेडं केलं आहे. आदित्यची क्रेझ ही मोठी आहे. त्याला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. बॉलीवूडचा हँडसम हंक म्हणून आदित्यचे नाव घेतले जाते.

आदित्यचा फॅन फॉलोइंग किती मोठा हे त्याच्या एका व्हिडिओवरुन दिसून आले आहे. आदित्य रॉयचे कपूरचं नाव गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडेशी जोडले जात आहे. त्या दोघांनाही नुकतचं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या रिसेप्शन पार्टीमध्ये स्पॉट केलं गेलं. तो जेव्हा त्या पार्टीला गेला होता तेव्हा त्या दरम्यान तिथं त्याच्या चाहत्यांनी त्याला गराडा घातला. यामध्ये तरुणींची संख्या अधिक होती.