BMC Budget 2023 : आज मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प होणार सादर; कुठे पाहू शकता, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 साठीचा अर्थसंकल्प आज ४ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आणि महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात मांडण्यात येणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यंदा पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. उत्पन्न वाढीचे नवे मार्ग शोधले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, आणि इतर सेवांसाठी अतिरीक्त कर लावला जाण्याची शक्यता आहे. भूमिगत टाक्या, अद्ययावत शिक्षण, कोस्टल रोड यांचा या अर्थसंकल्पात समावेश असेल.