Sankalp Hindu Times

देश

देश

“आरटीई कायद्यात सुधारणा करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी”

पुणे  : राईट टू एज्युकेशन ॲक्ट, 2009 मध्ये आवश्यक सुधारणा करून शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक, न्याय्य आणि प्रभावी करण्यासाठी नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.  यामध्ये प्रामुख्याने अनुदान, अंतर बदल, अल्पसंख्याक संस्थांना दिलेली सूट यांचा समावेश असल्याची माहिती  नागरिक सोशल फाउंडेशनचे सीए सर्वेश मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी संस्थेचे संचालक प्रीतम थोरवे, अमेय सप्रे उपस्थित होते.  पुढे बोलतान सीए सर्वेश मेहेंदळे म्हणाले, भारतीय संविधानातील कलम 21A नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, शिक्षण हा मूलभूत हक्क सर्वांना समानतेने मिळावा, अशी भूमिका संस्थेची आहे.  शिक्षण हा मूलभूत हक्क असल्यामुळे आरटीई  कायदा कोणत्याही अपवादाशिवाय सर्व शैक्षणिक संस्थांवर, अल्पसंख्याक संस्थांसह, समानपणे लागू करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांना सध्या दिलेली सूट (Section 1(5)) रद्द करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत एकसमान आणि न्याय्य धोरण लागू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. आरटीई अंतर्गत शाळांना दिले जाणारे अनुदान वेळेत न मिळाल्यास, थकीत रकमेवर व्याजासह पेमेंट करण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. सध्याचा 1 किमी/3 किमी अंतर निकष शहरांच्या वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा ठरत असल्याने, A+, A, B, C, D ग्रेडिंग प्रणालीवर आधारित नवीन निकष तयार करून ग्रामीण व शहरी भागांसाठी स्वतंत्र नियम निश्चित करावेत, असे सुचविण्यात आले.  समाजातील सर्व घटकांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

देश

“अखिल पुणे शहर रामनवमी उत्सव समिती व समर्थ युवा फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न”

पुणे : अखिल पुणे शहर रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नूमवि वाद्यपथकाच्या सहकार्याने उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झालेआयोजित करण्यात आलेले एकदिवसीय वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. रामनवमीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी, डोळ्यांची तपासणी (मोतीबिंदू/काचबिंदू), दातांची तपासणी, रक्तातील विविध घटकांची तपासणी, कोलेस्टेरॉल तपासणी, रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची तपासणी अशा विविध सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. सुमारे १३,५०० रुपयांच्या तपासण्या नागरिकांना विनामूल्य करण्यात आल्या.पुण्यातील पर्वती, कर्वेनगर, मंडई परिसर तसेच पद्मावती येथे आयोजित या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. विविध ठिकाणी रुग्णांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शनही तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले.आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सर्वसामान्यांना सुलभ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. आयोजकांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित कार्यकर्ते, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवकांचे विशेष योगदान राहिले.

देश

सुभाषनगर येथे ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न; शि. द. फडणीस यांचा विशेष सत्कार

सुभाषनगर परिसरात आयोजित करण्यात आलेले ‘सकल हिंदू संमेलन’ गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सायं. ६ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. “विचार एक – घोषणा एक – हिंदू सारा एक” या ब्रीदवाक्याखाली झालेल्या या संमेलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.या संमेलनाचे अध्यक्ष श्री. मोहनराव गुजराथी होते. सूत्र संचालन श्री. दिलीप टिकले यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. विविध मान्यवरांची ओळख करून देताना त्यांनी संपूर्ण कार्यक्रम रंगतदार केला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुनील देवधर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून संघाचा शंभर वर्षाचा इतिहास सांगताना, संघाचे संस्थापक प. पू. डॉ . हेडगेवार ह्यांचे चरित्र आणि संघ स्थापने मागील विचार, थोडक्यात सांगितला. स्वयंसेवकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघ कार्य देशाच्या काना कोपऱ्यात पोचवले. कित्येक स्वयंसेवकांनी जीवनाची आहुती दिली त्यामुळे आज संघ जगातील सर्वात मोठी संघटना झाला आहे. हिंदू समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. संमेलनात संतांचे आशीर्वचन देण्यासाठी श्री. भरतकुमार महाराज यांची उपस्थिती लाभली. त्यांनी अध्यात्मिक विचार मांडत समाजात एकात्मता आणि सद्भावनेचा संदेश दिला.यावेळी मराठीतील ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस (शि. द. फडणीस) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीतून गेली पाच दशके वाचकांना खळखळून हसवणाऱ्या फडणीस यांनी व्यंगचित्रांविषयीचा पारंपरिक समज बदलून टाकला. व्यंगचित्रे म्हणजे केवळ बोचरी टीका किंवा वेडीवाकडी रेखाटने नसून, त्यातूनही सौंदर्य, विनोद आणि सूक्ष्म संदेश व्यक्त होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या कलेतून दाखवून दिले. विशेष म्हणजे वयाच्या शंभरीतही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनीही आपले विचार मांडले. श्री.सौरभ कर्डे यांनी शिवव्याख्यानातून इतिहासाची उजळणी केली, तर प्रा. सुधीर गाडे यांनी सामाजिक समरसतेवर मार्गदर्शन केले. तसेच सौ. डिंपल शाह यांनी कुटुंब प्रबोधनावर विचार मांडले.यावेळी कलावर्धिनी डान्स कंपनीच्या सौ. अरुंधती पटवर्धन व त्यांच्या शिष्या ह्यांनी सादर केलेला संघ गीतांवर आधारित भरतनाट्यम नृत्याविष्कार विशेष आकर्षण ठरला. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट मिळाला.या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाषनगर परिसर सकल हिंदू संमेलन समिती तसेच परिसरातील सर्व प्रमुख सामाजिक व धार्मिक मंडळांचा सहभाग होता. सर्व मंडळांनी एकत्र येऊन केलेला हा पहिलाच कार्यक्रम होता. कार्यक्रमाने एकात्मतेचा आणि सांस्कृतिक जाणीवेचा प्रभावी संदेश दिला

देश

‘शिवराज दिना’निमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रसंगाची आठवण म्हणून ‘शिवराज दिन’ पुण्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हिंदू महिला सभेच्या वतीने हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम लाल महाल, पुणे येथे बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पार पडणार आहे. शिवकालीन इतिहासातील शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम असलेल्या शाहिस्तेखानाच्या बोटे कापण्याच्या प्रसंगाच्या स्मरणार्थ हा दिवस ‘शिवराज दिन’ म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमामध्ये ‘कथा शिवरायांची’ या विषयावर आधारित देखणा सांस्कृतिक सादरीकरण करण्यात येणार असून, शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांद्वारे उपस्थितांना इतिहासाची उजळणी घडवली जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नव्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांचे पराक्रम, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याची भावना पोहोचवणे हा आहे.आयोजकांच्या वतीने सर्व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवकार्याची प्रेरणा घेऊन हिंदुराष्ट्र अधिक समर्थ बनवण्याचा संदेश यावेळी देण्यात येणार आहे.

देश

धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तींना अनुसूचित जाती (SC) दर्जा लागू राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे धर्मांतर आणि आरक्षणाच्या हक्कांबाबत पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारते, तर ती अनुसूचित जातीच्या वर्गात राहू शकत नाही. न्यायालयाने नमूद केले की, “धर्मांतर झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येतो.”दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयात विशेषतः नमूद करण्यात आले की, ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या दलित व्यक्तीस अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (SC/ST Act) संरक्षण मिळणार नाही. या भूमिकेमुळे कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर महत्त्वाचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ हा ऐतिहासिक सामाजिक अन्याय आणि भेदभाव लक्षात घेऊन दिला गेला आहे. न्यायालयाच्या मते, हा दर्जा विशिष्ट सामाजिक-धार्मिक परिस्थितींशी संबंधित असल्याने धर्मांतरानंतर त्या परिस्थितीत बदल होतो, असे मानले जाते. या निर्णयामुळे धर्मस्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यामधील समतोलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, धर्मांतरानंतरही सामाजिक भेदभाव पूर्णपणे नाहीसा होत नाही, त्यामुळे अशा व्यक्तींना संरक्षण मिळावे, अशी मागणीही वेळोवेळी करण्यात येत आहे.दरम्यान, या निर्णयामुळे विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून भिन्न प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. काहीजण या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काहीजण यावर पुनर्विचार करण्याची मागणी करू शकतात.कायद्याच्या आणि समाजव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, पुढील काळात यावर अधिक सविस्तर चर्चा आणि कायदेशीर प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

देश

‘शनिवार पेठेत ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न; हिंदू बांधवांचा मोठा प्रतिसाद’

पुणे: “जातिपातीच्या भिंती विसरून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असा सूर काल शनिवार पेठ येथे आयोजित ‘सकल हिंदू संमेलनात’ उमटला. मोतीबाग वस्तीतील हिंदू बांधवांच्या सक्रिय सहभागातून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शनिवारी, २१ मार्च रोजी अहिल्यादेवी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.​कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. प्रीतम जोशी सर यांनी भूषवले.यावेळी वस्तीचे संयोजक श्री . हेमंत मांडके यांचे नेटके नियोजन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. सांस्कृतिक सादरीकरण:संमेलनाची सुरुवात कलानंद नृत्य संस्थेच्या (ठाणे) वतीने सादर करण्यात आलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गणेशवंदनेने झाली.कलानंद संस्थेच्या सौ. पल्लवी लेले निपुणगे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला .त्यानंतर मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘चरैवेति चरैवेति’ ही प्रेरणादायी प्रस्तुती दिली.हे नृत्य शर्मिला कुलकर्णी , योगिता शिंदे , श्वेतांबरी बोध ह्या शिक्षिकांनी बसवले होते ; मुख्याध्यापक प्रसाद लागू सर ह्यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमातील प्रमुख टप्पे:​प्रबोधन: सौ. अपर्णा लेले यांनी ‘पंचपरिवर्तन’ विषयावर मांडलेले विचार आणि ह.भ.प. तेजश्री बाभूळगावकर यांनी दिलेले ‘आशीर्वचन’ यामुळे उपस्थित श्रोत्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. ​इतिहास आणि गौरव: संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर आधारित ‘यशोगाथा’ श्री. जगदीश कश्यप यांनी मांडली.​​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन मांडके यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केले.विक्रम सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या ‘सांघिक गीताने’ वातावरणात चैतन्य भरले.​शेवटी सौ. प्रतीक्षा कुलकर्णी यांनी गायलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली. या संमेलनाला मोतीबाग वस्तीतील नागरिक सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

देश

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न’

भारतीय विचार साधना (भाविसा), पुणे यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नाना थिटे सभागृहात उत्साहात आणि मोठ्या उपस्थितीत पार पडला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री गिरीश प्रभुणे, लेखक अरुण करमरकर, ‘भाविसा’चे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, कार्यवाह काशिनाथ देवधर, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाचे लेखन दिलीप क्षीरसागर, अरुण करमरकर आणि दिलीप करंबळेकर यांनी केले असून, संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले.प्रमुख वक्ते सुनील आंबेकर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील विचार स्पष्ट करताना सांगितले की, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी समाजातील दोष दूर करून दीर्घकालीन परिवर्तन घडवण्यासाठी संघाची स्थापना केली. त्यांनी व्यक्ती निर्माण आणि त्या व्यक्तींचे संघटन या दोन घटकांवर विशेष भर दिला. समाजपरिवर्तन ही एक नैसर्गिक आणि सतत चालणारी प्रक्रिया असून, ती सर्वसामान्यांच्या सहभागातून घडते, असेही त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले की, संघ समजून घेण्यासाठी मोठ्या वैचारिक मांडणीपेक्षा स्वयंसेवकांचे दैनंदिन आचरण अधिक महत्त्वाचे आहे. संघाचे कार्य हे केवळ विचार मांडण्यापुरते मर्यादित नसून ते कृतीतून प्रकट होते, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतात भारतातील विस्कळीत झालेल्या समाजव्यवस्थेला एकत्र आणण्याचे कार्य संघाने केले असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रांतील वैचारिक गोंधळ कमी करण्यासाठी संघाचे योगदान महत्त्वाचे ठरले असून, हिंदुत्व हा सर्वांना जोडणारा विचार असल्याची जाणीव आज समाजाला होत असल्याचे त्यांनी नमूद केले. संघ हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून व्यापक सामाजिक एकात्मतेचा विचार मांडणारा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.लेखक अरुण करमरकर यांनी ‘स्वयंसेवक’ या संकल्पनेवर भाष्य करताना सांगितले की, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या तीन शब्दांची मीमांसा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘स्वयंसेवक’ या शब्दाचा अर्थ आणि त्यामागील मूल्ये समजून घेण्याचा आपला अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गिरीश आफळे यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला, तर काशिनाथ देवधर यांनी आभार प्रदर्शन केले.या प्रसंगी सुनील आंबेकर यांनी ‘धर्म’ आणि ‘रिलिजन’ या संकल्पनांमधील फरक अधोरेखित करताना सांगितले की, भारतीय परंपरेत ‘धर्म’ ही संकल्पना कर्तव्य, मूल्ये आणि समाजकल्याणाशी संबंधित आहे. पाश्चात्त्य ‘रिलिजन’ संकल्पनेशी तुलना केल्यामुळे या विचाराचा गैरसमज झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यकारभार, शिक्षण आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

देश

रा.स्व.संघाची – संघ शताब्दीच्या माध्यमातून यशोगाथा मांडत मध्यपुण्यात भव्य शोभायात्रा

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघाची यशोगाथा सांगणारा संघ शताब्दी रथ…जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष रथ…क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मराठी शाळा याविषयी माहिती देणारा समरसता रथछत्रपती शिवाजी महाराज रथसो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांचा रथअशा एकापाठोपाठ एक आलेल्या चित्ररथांचा सहभाग गुढीपाडव्याच्या मंगलमय सकाळी पुण्यात अनुभवायला मिळाला. याचसोबत पारंपारिक नगारा, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, मल्लखांब, वेत्रचर्म पथक, लहान मुलींचे साहसी आणि धाडसी खेळ इ. या भव्य शोभायात्रेत सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्ताने यंदाच्या वर्षी संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री. पंत फडके आणि श्री. भाऊराव क्षीरसागर यांच्याहस्ते गुढी उभारण्यात आली. त्यांच्यासोबत कसबा भागाचे मा. संघचालक श्री. प्रशांतजी यादव, मोतीबाग नगराचे मा. संघचालक श्री. शरदराव चंद्रचूड, मोतीबाग नगराचे कार्यवाह मा. श्री. प्रमोद वसगडेकर, श्री. अश्विन देवळणकर, श्री प्रदीप कदम इ. मान्यवर उपस्थित होते.या भव्यदिव्य शोभायात्रेत मा.खा. सौ. मेधाताई कुलकर्णी, मा.आ. श्री. हेमंत रासने, नगरसेवक श्री. राघवेंद्र(बाप्पू) मानकर, श्री. कुणाल टिळक, नगरसेविका सौ. स्वप्नाली नितीन पंडित, सौ. स्वरदा गौरव बापट, निवेदिताताई एकबोटे इ. मान्यवर उपस्थित होते.त्याचसोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संजीव जावळे, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री. विकास पवार, कोषाध्यक्ष श्री. नितीन पंडित, गजानन मित्र मंडळाचे श्री. सागर दहिभाते, जोगेश्वरी मंदिराचे श्री. बेंद्रे, जिलब्या मारुती मंडळाचे श्री. राजाभाऊ धावडे, सो. क्ष. कासार कालिका माता देवस्थान समितीचे श्री. भांडेकर, नवनीत मित्र मंडळाचे श्री. संतोष फडतरे, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समितीचे श्री. निलेश खडके, श्री. अमर भालेराव, इ. चा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संयोजक श्री. राघवेंद्र मानकर व सहसंयोजक चैतन्य कुसुरकर, यात्रा प्रमुख गौरव पावटेकर, अथर्व दातार यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. एकत्र होऊनिया सारे… गुढी उभारु हिंदुत्वाची असे म्हणत पारंपरिक वेशात सहभागी पुणेकरांनी शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील गणेश मंडळांचाही तितकाच उस्फुर्तताने सहभाग दिसून आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट, मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ, नवनीत मित्र मंडळ, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समिती, कालिका माता देवस्थान समिती, अखिल शनिवार पेठ रामनवमी उत्सव समिती, श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, ट्रस्ट यांनी देखील सहभाग घेतला. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरु झालेली शोभायात्रा तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर पर्यंत काढण्यात आली. यावेळी गुढी देखील उभारण्यात आली.

देश

नवीन रेल्वे स्टेशनला ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांचे नाव देण्याची मागणी

ठाणे–मुलुंडदरम्यान प्रस्तावित नव्या रेल्वे स्टेशनला दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे.ठाणे आणि मुलुंड या दरम्यान उभारण्यात येणारे हे नवीन रेल्वे स्टेशन लवकरच मार्गी लागणार असून, या स्टेशनला ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, असे मत त्यांनी मांडले.खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत मांडलेल्या या मागणीमुळे ठाणे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.दरम्यान, ठाणे–मुलुंडदरम्यानचे हे नवीन स्टेशन रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे. आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्यातील अत्यंत प्रभावशाली आणि जनमानसात रुजलेले नेते होते.शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात.त्यांनी ठाण्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिलेसर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असायचे,त्यांच्या कामाची शैली अत्यंत थेट, स्पष्ट आणि जनतेशी जोडलेली होती.“धर्मवीर” ही पदवी त्यांना त्यांच्या कार्यामुळेच मिळाली,ठाण्यातील अनेकांसाठी ते केवळ राजकारणी नव्हते,तर आधारवड आणि न्यायासाठी लढणारा नेता होते. ठाणे–मुलुंडदरम्यानचे हे नवीन रेल्वे स्टेशन वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता महत्त्वाचे ठरणार स्थानिकांना प्रवासात दिलासा देणार रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करणार,या मागणीमुळे ठाणे परिसरात पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.आता या प्रस्तावावर शासन आणि रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देश

“गंगा नदी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय; वाराणसीतील घटनेवर संताप”

वाराणसीत बोटवरील इफ्तार कार्यक्रमात गंगेत हाडे टाकल्याचा आरोप; १४ जण अटकेत वाराणसी येथे गंगा नदीवर आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार कार्यक्रमादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप समोर आला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्तींनी जेवणानंतर मांसाचे हाडे गंगा नदीत टाकल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रमजान महिन्यानिमित्त गंगा नदीत बोटीत इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान काही सहभागी व्यक्तींनी चिकन बिर्याणीचे सेवन केल्यानंतर त्यातील उरलेले हाडे नदीत फेकल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. गंगा नदीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारच्या कृतींमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली. तसेच, धार्मिक भावना भडकवणे किंवा दुखावणे हे कायद्याने दंडनीय कृत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित १४ जणांना ताब्यात घेतले. गंगेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारच्या कृत्यांमुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.दरम्यान, प्रशासनाने सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता आणि सामाजिक सौहार्द जपण्याचे आवाहन केले आहे.

Scroll to Top