रमेश बैस यांचा झारखंडमधला राज्यपालपदाचा इतिहास काय सांगतो?
भगतसिंग कोश्यारी यांच्या विविध वक्तव्यांवर राजकीय वादंग माजल्यानंतर आणि त्यांनी स्वत: अनेकदा निवृत्तीची इच्छा व्यक्त केल्यानंतर अखेरीस त्यांचा राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला. त्यांच्या जाण्यासाठी आग्रही असणाऱ्या ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांची जणू एका प्रकारच्या विजयाच्या आनंदी प्रतिक्रियाही आल्या.
झारखंड सरकार विरुद्ध राज्यपाल बैस
रमेश बैस हे पहिल्यांदा त्रिपुराचे राज्यपाल पण त्यानंतर लवकरच ते झारखंडचे राज्यपाल झाले. तेव्हा राज्यात हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालीय ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ आणि कॉंग्रेसचं एकत्र सरकार होतं आणि अजूनही आहे.