संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

Kartik Aaryan: ‘बहुत दुखनेवाला है..’, जेव्हा सलमाननं कार्तिकला दिलेली वॉर्निंग; वाचा किस्सा..

तुमच्या मित्रांना शेअर करा

Salman Khan warned Kartik Aaryan: कार्तिक आर्यन सलमान खानच्या ‘कॅरेक्टर ढीला है’ या गाण्याच्या रीमेकवर नाचला अन् अनेकांच्या भूवया उंचावल्या. अर्थात त्याला नावं ठेवण्याच्या हेतूनं. पण दबंग खाननं मात्र ‘शहजादा’ च्या अभिनेत्याला भरपूर पाठिंबा दिला.

त्यावेळी कार्तिक भलताच खूश झाला,जेव्हा सलमाननं कार्तिकच्या ‘कॅरेक्टर ढीला २.०’ या गाण्याला शेअर केलं. पण सलमान खाननं कार्तिक आर्यनच्या या गाण्यातील स्टेपविषयी त्याला वॉर्निंग दिली होती. कार्तिकनं नुकत्याच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

कार्तिक आर्यनचं ‘कॅरेक्टर ढीला २.०’ या गाण्याला त्याच्या चाहत्यांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. कार्तिक आर्यनच्या गाण्यातील डान्स स्टेप्सची खूपच प्रशंसा होताना दिसत आहे. अगदी त्या डान्स स्टेप्सच्या देखील चाहते प्रेमात पडताना दिसत आहेत,जिला करताना दस्तुरखुद्द सलमान खानची अवस्था खूपच बिकट झाली होती.

सलमाननं या संदर्भात म्हणूनच कार्तिकला देखील इशारा दिला होता.