संकल्प हिंदू टाइम्स

13th June 2024

Kasba Bypoll Election : भाजपाचा ‘हुकमी एक्का’ उतरणार मैदानात; विरोधकांचं टेन्शन वाढलं!

तुमच्या मित्रांना शेअर करा

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून याची राज्यभर चर्चा आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी या दोन्ही ठिकाणांवर मतदान पार पडणार असून, काल संध्याकाळपासून कसब्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली जवळपास सात तास बैठका पार पडल्या आहेत. त्यामुळे कसब्यासह चिंडवडची जागा जिंकण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. या सर्वांमध्ये कसब्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काल फडणवीसांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता स्वतः गिरीश बापट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.