संकल्प हिंदू टाइम्स

15th June 2024

Mumbai Start-Up: ‘मास्टर क्लास’च्या माध्यमातून विद्यार्थ्यामधून उद्योजक घडवण्याचा प्रयत्न

तुमच्या मित्रांना शेअर करा

स्टार्ट अप संस्कृतीची बीजपेरणी शाळकरी मुलांमध्ये झाली तसेच देशातील यशस्वी उद्योजकांशी विद्यार्थ्यांना संवाद साधायला मिळाला तर नवे उद्योजक घडवता येणे शक्य आहे. हा धागा पकडून अरविंद मफतलाल ग्रूपने ‘स्टार्ट मास्टर क्लास’ या उपक्रमाची सुरुवात केली. या क्लासच्या माध्यमातून देशातील अग्रगण्य उद्योजगांकडून एक यशस्वी उद्योग कसा उभारावा याचे धडे विद्यार्थी गिरवत आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत अभ्यासक्रमात उद्यमशीलता विकसित करण्याला तसेच कौशल्य विकासाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. या अंतर्गत अरविंद मफतलाल उद्योगसमूहाच्या ‘गेट सेट लर्न’ या सहयोगी कंपनीने २३ डिसेंबरपासून ‘स्टार्टअप मास्टर क्लास’ हा ऑनलाईन  उपक्रम सुरु केला आहे. या निशुल्क क्सासेच्या माध्यमातून मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना नामवंत उद्योजकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.

या मास्टर क्लासमध्ये मुंबई, पुणे, बंगळुरुसह देशातील १०० शाळेमधील १५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालल्याचे सांगण्यात आले आहे