केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम ठेवत तब्बल 58 मिनिटांचे भाषण केले.
अर्थमंत्र्यानी आपल्या भाषणात काहीं मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र दुसरीकडे कररचनेत कोणतेही बदल न करता तीच कर पद्धती कायम असल्याचे सांगितले. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्र्यांनी येत्या दोन महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्पात चार क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून यामध्ये गरीब ,महिला, तरुण आणि अन्नदाता शेतकरी अशी क्षेत्र आहेत.
आता पाहूयात अर्थसंकल्पातील
काही महत्त्वाच्या घोषणा….
1)टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही.
2)१० वर्ष जुन्या १० हजार रुपयांपर्यंतचा कर माफ. यामुळे नागरिकांच्या परताव्याची अनेक प्रकरणे निकाली निघणार
3)राज्यांना ७५ हजार कोटी रुपयांचं कर्ज
4)जुलैच्या अर्थसंकल्पात विकसित भारताचा रोडमॅप दिसेल .
5)५ वर्षांत २ कोटी गरिबांसाठी घरं
6)पायाभूत सुविधांवर ११ टक्के अधिक खर्च.
7)वंदे भारतमध्ये ४० हजार रेल्वे बोगी बदलण्यात येणार.
8)लक्षद्वीपच्या विकासासाठी विशेष योजना.
9)३ नवे रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा.
10)गरिबांसाठी : सरकारने २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. गरीब कल्याण योजनेंतर्गत ३४ लाख कोटी खात्यांवर पाठवले.
11) महिलांसाठी: सुमारे १ कोटी महिला बनल्या लखपती दीदी. आता ३ कोटी लखपती दीदी बनवण्याचे टार्गेट आहे.
12) तरुणांसाठी : तीन हजार नवीन आयआयटी उघडण्यात आल्या आहेत. ५४ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
13)शेतकरी पंतप्रधान किसान योजनेतून ११.८ कोटी लोकांना आर्थिक मदत मिळाली आहे.