संकल्प हिंदू टाइम्स

27th July 2024

‘बॉयकॉट ट्रेंड’चा मालदीव पर्यटनाला किती फटका बसला? आकडेवारी आली समोर

तुमच्या मित्रांना शेअर करा

मालदीव जगभरात तेथील सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. दरम्यान मागच्या काही दिवसात मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकडेवारीत मोठा फरक पडला आहे. मालदीवला सर्वाधिक संख्येने भेट देणाऱ्यांमध्ये भारतीयांचा क्रमांक तिसरा होता, तो अवघ्या तीन आठवड्यांच्या काळात खाली घसरून पाचवा झाला आहे. मालदीव पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. मालदीवला पर्यटनासा्ठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. २०२३ च्या आकडेवारीनुसार ११ टक्के पर्यटक हे भारतीय होते. मात्र नुकतेच झालेल्या पंतप्रधान मोदींबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर या पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे.