संकल्प हिंदू टाइम्स

1st September 2024

‘माझ्या भावानं जर माझं ऐकलं असतं तर’ सलमान काय म्हणाला माहितीये?

तुमच्या मित्रांना शेअर करा

अरबाज खानच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद देखील मिळाला होता. या सगळ्यात अरबजान खाननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो सह दिलेली कॅप्शन नेटकऱ्यांच्या कमेंटचा विषय होती. या सगळ्यात आता अरबाजच्या दुसऱ्या लग्नावर सलमाननं दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

त्याचं झालं असं की, काल बिग बॉसच्या १७ व्या सीझनचं होस्टिंग करत असताना सलमानला कॉमेडियन भारतीनं अरबाजच्या लग्नावरुन प्रश्न विचारला होता. मेकर्सनं अरबाज आणि सोहेल खानला त्या शो चे खास निमंत्रण दिले होते. ते त्या शो मध्ये आल्यावर भारतीनं सलमानला विचारले की, तुमचा भाऊ दुसरं लग्न करतो आहे, त्याला तुम्ही काय सल्ला द्याल?