अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठीतीच्या संघर्षाचा इतिहास
अयोध्येत राममंदिराची प्रतीक्षा ही अनेक शतकांची होती. ती पुर्ण झाली आहे. सोमवारी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासीक सोहळा पार पडला आहे. जाणून घ्या पंधराव्या दशकापासूनचा संपुर्ण इतिहास…
१५२८ – मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने राममंदिर पाडून बाबरी मशीद बांधली
१८८५ – महंत रघुवीर दास यांनी फैजाबाद जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून वादग्रस्त इमारतीच्या बाहेर छत बांधण्याची परवानगी मागितली आहे.न्यायालयाने याचिका फेटाळली
एप्रिल २००२ – अलाहाबाद उच्च न्यायालयात वादग्रस्त जागेची मालकी कोणाची आहे हे ठरवण्यासाठी सुनावणी सुरू झाली
३० सप्टेंबर २०१० – उच्च न्यायालयाने दोन विरुद्ध एक अशा मतांनी वादग्रस्त जमिनीचे सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला या तिघांमध्ये वाटप केले
९ मे २०११ – अयोध्येतील जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली
जानेवारी २०१९ – सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना केली
६ ऑगस्ट २०१९ – सर्वोच्च न्यायालयाने जमिनीच्या वादावर दैनंदिन सुनावणी सुरू
९ नोव्हेंबर २०१९ – अयोध्येतील पूर्ण २.७७ एकर वादग्रस्त जमीन रामलल्लाला मंजूर करण्याचा व ताबा केंद्र सरकारकडे राहील, असा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पाच एकर जमीन देण्याचेही सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला निर्देश
५ फेब्रुवारी २०२० – अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा
५ ऑगस्ट २०२० – पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी२२ जानेवारी २०२४ – अयोध्येतील मंदिरात राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा