संकल्प हिंदू टाइम्स

23rd February 2025

‘तुम्हाला सगळीकडेच राजकारण कसं दिसतं’? रजनीकांत यांनी राम मंदिराबाबत मोठी प्रतिक्रिया!

तुमच्या मित्रांना शेअर करा

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींचे फोटो व्हायरल झाले होते. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह आलिया भट्ट, रजनीकांत, रणबीर कपूर, कतरिना कैफ यांनी फोटो पोस्ट केले होते.

साऊथचे थलायवा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या रजनीकांत यांचा फोटो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर आता रजनीकांत हे चैन्नईमध्ये आल्यानंतर त्यांनी मीडियाशी बातचीत केली आहे. त्याचा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. राम मंदिराचे दर्शन घेणाऱ्या त्या १५० जणांमध्ये मी देखील होतो. अशी भावना रजनीकांत यांनी व्यक्त केली आहे.