Sankalp Hindu Times

टिकली-गंध वादानंतर लेन्सकार्टचे शेअर गडगडले; मार्केट कॅप ९०,००० कोटींखाली

मुंबई : शेअर बाजारात तेजी असतानाही लेन्सकार्टच्या शेअरमध्ये सोमवारी घसरण पाहायला मिळाली. ड्रेस कोड वादाचा थेट परिणाम कंपनीच्या समभागांवर झाल्याचे दिसून आले.
शुक्रवारी ५३४.८५ रुपयांवर बंद झालेला शेअर सोमवारी ५३०.०५ रुपयांवर उघडला आणि दुपारपर्यंत सुमारे २% घसरून ५२४ रुपयांवर आला. विशेष म्हणजे, १५ एप्रिल रोजी हाच शेअर ५५९.८० रुपयांच्या ऑल-टाइम हाईवर होता. त्यानंतर आतापर्यंत ७% पेक्षा अधिक घसरण झाली असून कंपनीचे मार्केट कॅप ९०,००० कोटी रुपयांखाली आले आहे.


नेमका काय वाद झाला?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ड्रेसकोड डॉक्युमेंटमुळे वाद निर्माण झाला. कंपनीने स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टिकली व गंध लावण्यास मनाई केल्याचा आरोप झाला. वाद वाढल्यानंतर कंपनीने सार्वजनिक माफी मागितली आणि धार्मिक व सांस्कृतिक प्रतीकांना परवानगी दिली. संस्थापक पीयुष गोयल यांनी स्पष्ट केले की व्हायरल डॉक्युमेंट जुने असून सध्याच्या धोरणात कोणतीही बंदी नाही.
IPO नंतरची कामगिरी —
लेन्सकार्टचा IPO गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ₹४०२ इश्यू प्राइसने आला होता. त्यानंतर या वर्षात शेअरमध्ये सुमारे १७.५८% तर गेल्या सहा महिन्यांत २७.९१% तेजी नोंदली गेली होती. मात्र आता वादामुळे गुंतवणूकदारांच्या मनात साशंकता निर्माण झाल्याचे दिसत आहे.

Scroll to Top