संकल्प हिंदू टाइम्स

8th November 2024

विराटचा स्वॅगच निराळा! चेतन शर्मानी केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर कोहलीची पहिली पोस्ट

तुमच्या मित्रांना शेअर करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : मंगळवारी  बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचे केलेले स्टिंग ऑपरेशन जगासमोर आल्यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा यांनी भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक गोपनीय विषयांचा खुलासा केला आहे. फिटनेस सिद्ध करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू इंजेक्शन घेतात इथपासून ते विराट कोहली आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील इगो प्रॉब्लेम अशा सर्वच गोपनीय गोष्टी चेतन यांनी उघड केल्या. यानंतर आता विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक  स्टोरी पोस्ट केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना हा दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला 17 मार्च पासून सुरुवात होणार असल्याने भारतीय संघ दिल्ली येथे दाखल होत आहे. भारतच स्टार फलंदाज विराट कोहली देखील बऱ्याच काळानंतर दिल्ली येथील स्टेडियमवर पोहोचला. त्याने हॉटेलमधून स्टेडियमवर जात असताना एक फोटो स्टोरीवर शेअर केला.