तुर्की आणि सीरियामध्ये मृत्यूतांडव, मृतांचा आकडा 7726 वर, 3 महिने आणीबाणी लागू
तुर्की, 08 फेब्रुवारी : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भुकंपामुळे हाहाकार उडाला आहे. या दोन्ही देशामध्ये आतापर्यंत भूकंपामुळे मृतांची संख्या 7726 वर पोहोचली आहे. तर 42,259 लोक जखमी झाले आहे. दोन्ही देशांमध्ये आता 3 महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
भूकंपाने दोन्ही देशांमध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 7726 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 42,259 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी भारताने दोन विमानांद्वारे मदत साहित्य आणि वैद्यकीय पथक पाठवले आहे. यानंतर तुर्कस्तानच्या नागरिक देखील भारतीयांचे आभार मानायला विसरले नाही. तुर्कस्तानचे भारतातील राजदूत फिरत सुनेल यांनी न्यूज18 हिंदीशी विशेष संवाद साधताना सांगितले की, ‘मला खूप आनंद झाला आहे की भूकंपानंतर काही तासांतच भारताने या संकटात मदत करण्यासाठी तत्काळ पावले उचलली आणि बचाव पथके तुर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला. आता आपण तुर्कीमध्ये भारतीय पथक पाहू शकतो, जे तेथे बचाव कार्यात मदत करत आहेत.