संकल्प हिंदू टाइम्स

15th June 2024

शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला, पुण्याशी आहे जवळचा संबंध

तुमच्या मित्रांना शेअर करा

मुंबई, 8 फेब्रुवारी :  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भावना निर्माण केली होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. त्यांच्या पराक्रमाची कीर्ती जगभरात पसरलेली आहे. परदेशात अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे आणि त्यांच्या विषयीचं साहित्य उपलब्ध आहे. उत्तर अमेरिका खंडामध्येही त्यांचा एक पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

कॅलिफोर्नियातील सॅन जोस शहरातील एका उद्यानातून हा पुतळा चोरीला गेला आहे. उत्तर अमेरिकेत अस्तित्त्वात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पुण्याशी जवळचं कनेक्शन

महाराष्ट्रातील पुणे शहराला सॅन जोस शहराची ‘सिस्टर सिटी’ मानलं जातं. सॅन जोसला पुणे शहराकडूनच हा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा हा संपूर्ण उत्तर अमेरिका खंडातील एकमेव पुतळा होता. हा पुतळा नेमका कधी चोरी झाला हे स्पष्ट झालेलं नाही, असं वृत्त ‘केटीव्हीयू’नं प्रसिद्ध केलं आहे.