Alibag Dumping ground fire : अलिबागकरांचे आरोग्य धोक्यात!
अलिबाग : शहरातील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे दोन दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये धुराचे लोट येत आहेत. या धुरामुळे शहरातील मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. धुरामुळे श्वसन विकार होण्याचाही धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
शहराचे आरोग्य हे तेथील सार्वजनिक स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. मात्र, अलिबाग शहरातील कचरा डेपोला सोमवारी रात्री लागलेल्या आगीमुळे दोन दिवसांपासून काही भागांत धुराचे लोट अजूनही आहेत. यामुळे स्थानिकांचे डोळे जळजळत असून काहींना श्वसनाचा त्रास होत आहे.