संकल्प हिंदू टाइम्स

21st December 2024

Kerala High Court : धार्मिक कार्यक्रमात कोणता रंग वापरायचा? वादावर High Court चं मोठं भाष्य

तुमच्या मित्रांना शेअर करा

 मंदिर आणि पोलीस प्रशासन यांच्यातील वादावर केरळ उच्च न्यायालयानं (Kerala High Court) आज (गुरुवार) मोठं भाष्य केलं. कोणत्याही मंदिराच्या समारंभांत केवळ राजकीयदृष्ट्या तटस्थ रंगांचा वापर केला जाईल, असा दबाव जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर आणता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलंय. भद्रकाली देवी मंदिराच्या (Bhadrakali Devi Temple) त्रावणकोर देवस्वोम बोर्डानं (Travancore Devaswom Board) प्रशासनाच्या आदेशाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिलं. कलियुत्तू उत्सवाच्या सजावटीसाठी केवळ भगव्या रंगाला (Saffron Color) परवानगी देता येणार नाही, असं प्रशासनानं मंदिर मंडळाला सांगितलं होतं. यासंदर्भात दाखल झालेल्या दोन याचिकांवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.