Sankalp Hindu Times

देश

देश

संयुक्त प्रसाद मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने फाल्गुण कृष्ण तृतीया, शके १९४७, शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी “शिवजन्मोत्सव सोहळा” मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध युवा शिवव्याख्याते मा. श्री. सर्वेशजी मेहेंदळे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. “शिवचरित्र – शिवराय म्हणजे संकल्प, समर्पण, बलिदान, शौर्य आणि स्वाभिमानाचा रोमांचकारी इतिहास” या विषयावर त्यांनी प्रभावी भाषण केले. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थित शेकडो शिवभक्त भारावून गेले. कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.यावेळी स्वस्तिक सोशल फाउंडेशन संचलित गोशाळेसाठी निधी देऊन सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. कार्यक्रमास प्रभाग क्रमांक २५ मधील नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर, सौ. स्वप्नाली पंडित तसेच सौ. स्वरदाताई बापट आणि कसबा अध्यक्ष अमितजी कंक उपस्थित होते.तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप कसबे यांनी मंडळाला भेट देऊन मंडळाच्या सामाजिक व सेवाभावी कार्याचे कौतुक केले.वक्ता परिचय राधेय डिंगरे यांनी करून दिला. तसेच मंडळाचे कुणाल आहेर, संदीप उभे, सुनील मोहिते, प्रणित शिंदे व निखिल हजारे यांनी शिवव्याख्याते सर्वेशजी मेहेंदळे यांचा शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व फळांची टोकरी देऊन सत्कार करण्यात आला.शिवजयंती निमित्त मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मा. नगरसेवक राजेशजी येनपुरे, उद्योजक विनोद शेठ साखला, विशालजी आढाव, रोहितजी महाजन व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी राधिका डिंगरे, वेदांत सुतार, अंशुल मोहिते, देवेश गायकवाड, श्रेयस डिंगरे व इतर बाल कार्यकर्त्यांनी लाठी-काठी खेळ तसेच पोवाडा सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक उभे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुदत्त डिंगरे यांनी केले.अजित परांजपे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संयुक्त प्रसाद मित्र मंडळ या नारायण पेठ, पुणे व कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देश

संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनात भारतीय स्त्रीशक्तीचा सहभाग

जागतिक स्तरावर महिलांचे हक्क, सक्षमीकरण आणि समानता यांसंदर्भात महत्त्वपूर्ण मानले जाणारे संयुक्त राष्ट्र महिला स्थिती आयोगाचे ७० वे अधिवेशन ९ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत संयुक्त राष्ट्र मुख्यालय, न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात येत आहे. या अधिवेशनात जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्था तसेच आर्थिक व सामाजिक परिषदेकडून मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.या आंतरराष्ट्रीय मंचावर भारतातील भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या प्रतिनिधींचा सहभाग ही अभिमानाची बाब मानली जात आहे. भारतीय समाजजीवनात स्त्रीशक्तीची भूमिका, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि स्त्री सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या माध्यमातून जागतिक स्तरावर मांडली जाणार आहे.या अधिवेशनात भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने नयना सहस्रबुद्धे, डॉ. ज्योती चौथाईवाले, निपा शुक्ला, उज्वला करंबेळकर, विशाखा माशंकर, रश्मी सामंत आणि साजी नारायण या प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. या सर्व प्रतिनिधी विविध चर्चासत्रे, संवाद आणि विचारमंथनाच्या माध्यमातून भारतीय स्त्रीशक्तीचे विचार आणि अनुभव आंतरराष्ट्रीय मंचावर मांडणार आहेत.या अधिवेशनाचा प्रमुख विषय “सर्व महिला व मुलींना न्यायप्रवेश सुनिश्चित करणे आणि बळकट करणे” हा आहे. या अंतर्गत सर्वसमावेशक आणि न्याय्य कायदेव्यवस्था निर्माण करणे, भेदभावपूर्ण कायदे, धोरणे आणि पद्धती दूर करणे तसेच महिलांना न्याय मिळविताना येणाऱ्या संरचनात्मक अडथळ्यांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. याशिवाय महिलांना न्यायव्यवस्थेत समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे अधिकार प्रभावीपणे संरक्षित करणे आणि सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय पातळीवर त्यांचे सशक्तीकरण करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.तसेच या अधिवेशनात पुनरावलोकन विषय म्हणून सार्वजनिक जीवनात महिलांचा पूर्ण आणि प्रभावी सहभाग, निर्णयप्रक्रियेत त्यांची भूमिका अधिक सक्षम करणे तसेच महिलांवरील हिंसाचाराचे निर्मूलन करून स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विविध देशांच्या अनुभवांचा आढावा घेतला जाणार आहे. महिलांच्या नेतृत्वविकासाला चालना देणे, धोरणनिर्मिती प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवरही या अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे.भारतीय स्त्रीशक्तीच्या प्रतिनिधींना या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत असून, जागतिक स्तरावर भारताच्या स्त्रीशक्तीचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देश

तेल बाजारात खळबळ! रशिया-भारत व्यवहार पुन्हा चर्चेत

मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना भारतआणि रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या व्यवहाराकडे पुन्हा लक्ष लागले आहे. जागतिक तेल बाजारात अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही संधी ठरू शकते. जागतिक तेल बाजारात सध्या अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावामुळे अनेक देश आपल्या ऊर्जा सुरक्षेबाबत नव्याने रणनीती आखत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत आणि रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या व्यवहाराकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे.गेल्या काही वर्षांत रशियावर पाश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध लावल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या पुरवठ्याचे समीकरण बदलले. या काळात भारताने ऊर्जा गरजांचा विचार करून रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करण्याचा पर्याय स्वीकारला. परिणामी भारताला तुलनेने कमी दरात तेल उपलब्ध झाले आणि देशाच्या इंधन पुरवठ्यावर तातडीचा दबाव येऊ दिला गेला नाही.तज्ज्ञांच्या मते, सध्या मध्यपूर्वेत वाढत असलेला तणाव आणि समुद्री मार्गांवरील अनिश्चितता यामुळे जागतिक तेलाच्या किमतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रशियाकडून होणारा पुरवठा भारतासाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. यामुळे देशाच्या ऊर्जा गरजांसाठी विविध स्रोत उपलब्ध राहतात.दरम्यान, ऊर्जा क्षेत्रातील विश्लेषकांचे मत आहे की भारत दीर्घकालीन दृष्टीने एकाच देशावर अवलंबून राहण्याऐवजी विविध देशांशी तेल व्यवहार वाढवण्याच्या धोरणावर भर देत आहे. त्यामुळे रशियाबरोबरचे व्यवहार हे भारताच्या व्यापक ऊर्जा धोरणाचा एक भाग म्हणून पाहिले जात आहेत.जागतिक परिस्थिती सतत बदलत असताना भारत सरकार ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आगामी काळात जागतिक तेल बाजारात होणाऱ्या बदलांनुसार भारताचे आयात धोरणही त्यानुसार समायोजित केले जाईल, असे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत.

देश

संजय राऊत सावधान…!

आता राज्यसभेत आंबेडकरी विचारांची लेक शिवसेनेची रणरागिणी येत आहे…! राजकारणात कधी कधी एखादं नाव केवळ व्यक्ती नसतं, तर तो एक स्पष्ट राजकीय संदेश असतो. शिवसेनेकडून प्रा. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेसाठी झालेली निवडही तशीच मानली जात आहे. आक्रमक वक्तृत्व, अभ्यासू भूमिका आणि आंबेडकरी विचारांची ठाम मांडणी करणारा एक आवाज आता थेट संसदेत पोहोचणार आहे.सोलापूरच्या साध्या कुटुंबात जन्मलेल्या ज्योती वाघमारे यांचा प्रवास हा संघर्षातून घडलेला आहे. झोपडीतील आयुष्य, कष्ट करणारे आई-वडील आणि चिमणीच्या प्रकाशात केलेला अभ्यास — या सगळ्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षणाची वाट निवडली. त्यांच्या जिद्दीचा परिणाम असा की बारावीच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येत त्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनात बाळगून त्यांनी आपली बौद्धिक आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवली. प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच आंबेडकरी चळवळीशी त्यांचा मजबूत संबंध कायम राहिला.एप्रिल २०२३ मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, धारदार मांडणी आणि प्रभावी वक्तृत्वामुळे त्या लवकरच पक्षाच्या राज्य प्रवक्त्या म्हणून पुढे आल्या. मराठी, हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये संवाद साधत त्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडत राहिल्या.विशेष म्हणजे विरोधकांच्या टीकेला तर्कशुद्ध आणि आक्रमक शैलीत उत्तर देणाऱ्या चेहऱ्यांमध्ये त्यांचे नाव पुढे येऊ लागले. अनेकदा माध्यमांमध्ये विरोधी गटातील नेत्यांना, विशेषतः संजय राऊत यांना त्यांनी दिलेली प्रत्युत्तरे चर्चेचा विषय ठरली. त्यामुळेच शिवसेनेकडून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय हा केवळ राजकीय प्रतिनिधित्व नाही, तर एक स्पष्ट संदेश मानला जात आहे. आता संसदेतूनही आंबेडकरी विचारांची ठाम आणि अभ्यासपूर्ण मांडणी ऐकायला मिळणार आहे.झोपडीपासून संसद भवनापर्यंतचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही; तो संघर्ष, शिक्षण आणि विचारांच्या शक्तीचा पुरावा आहे.सोलापूरच्या या लेकीने आज राज्यसभेपर्यंत मजल मारली आहे.आणि म्हणूनच आता एक गोष्ट स्पष्ट आहे. राजकारणात आवाज मोठा असणे महत्त्वाचे नाही पण त्यामागे विचार, अभ्यास आणि संघर्ष असेल तर तो आवाज संसदेतही दुमदुमतो.सोलापूरच्या रणरागिणीला सलाम!

देश

“मिलन 2026 मधून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर हल्ला; श्रीलंकेजवळ IRIS Dena बुडाली”

अलीकडे श्रीलंकेच्या दक्षिणेस गॅले समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ४० नॉटिकल मैल अंतरावर इराणची युद्धनौका IRIS Dena बुडाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ही नौका भारतात आयोजित करण्यात आलेल्या बहुराष्ट्रीय नौदल युद्धअभ्यास MILAN 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी आली होती आणि कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या मायदेशी परत जात असताना तिच्यावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्घटनेत जहाजावरील अनेक खलाशांचा मृत्यू झाला असून काहीजण बेपत्ता आहेत. या घटनेमुळे मानवी जीवितहानी झाली असून त्याबद्दल आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या खलाशांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो तसेच जखमी व बचावलेल्या कर्मचाऱ्यांच्या लवकरात लवकर सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.ही घटना आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात घडली असली तरी, भारताच्या निमंत्रणावरून आलेल्या मित्रदेशाच्या युद्धनौकेबाबत घडलेली ही घटना आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने गंभीर मानली जाते. अशा प्रकारच्या कारवायांमुळे जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी होणे आणि संबंधित घटकांनी संयम राखणे आवश्यक आहे.या दुर्घटनेनंतर बचावकार्य करण्यात श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. मानवी दृष्टिकोनातून त्यांनी दाखवलेली तत्परता आणि सहकार्य प्रशंसनीय आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता, संवाद आणि परस्पर आदर यांचे तत्त्व जपले गेले पाहिजे. समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र हे सर्व देशांसाठी सुरक्षित आणि शांततापूर्ण राहणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जागतिक समुदायाने अधिक जबाबदारीने व संयमाने वागणे गरजेचे आहे.आमची भूमिका स्पष्ट आहे , कोणत्याही प्रकारच्या हिंसक कारवाईपेक्षा संवाद आणि शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवणे हेच दीर्घकालीन स्थैर्यासाठी आवश्यक आहे.

देश

मोतीबाग नगर येथे सकल हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोतीबाग नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू संमेलनास समाजबंधूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजसंघटन, एकात्मता आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.संमेलनात पूज्य भावार्थ देखणे यांचे आशिर्वचन लाभले. त्यांनी समाजाने एकत्र येऊन संस्कार, संघटन व सदाचाराचा मार्ग स्वीकारावा तसेच धर्मनिष्ठ जीवन जगण्याचे आवाहन केले.या वेळी अंजली ताई तागडे यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर सविस्तर विवेचन केले. समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या पाच प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच इतिहास संशोधक पांडुरंग बालकावडे यांनी ‘संघाचे शंभर वर्षांचे यशोगाथा’ या विषयावर मार्गदर्शन करत शतकभराच्या कार्याचा प्रेरणादायी आढावा मांडला.कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक मंडळ व कार्यकर्त्यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले.विशेष म्हणजे, सकल हिंदू संमेलन १ ते ३० मार्च दरम्यान पुणे येथे विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोतीबाग नगर येथील संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे शहरातील विविध भागांत होणाऱ्या या संमेलनांमध्ये समाजातील सर्व बंधूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.सकल हिंदू धर्म जागृतीसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम यशस्वी होवो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

देश

मध्यपूर्वेत तणाव तीव्र: इराण–इस्रायल–अमेरिका संघर्ष उफाळला

मध्यपूर्वेत सध्या Iran, Israel आणि United States यांच्यातील तणाव गंभीर स्वरूप धारण करत आहे. अलीकडील लष्करी कारवायांमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता वाढली असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील काही सामरिक आणि लष्करी ठिकाणांवर हवाई व क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. या कारवायांचा उद्देश इराणच्या संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्र क्षमतेला कमकुवत करणे हा असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे. इराणची तीव्र प्रतिक्रिया इराण सरकारने या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच, इराणने आपली लष्करी कारवाई ‘स्वसंरक्षणासाठी’ असल्याचा दावा केला आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी त्यांनी जागतिक संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.अमेरिकेची भूमिका अमेरिकेने आपल्या कारवायांना “प्रादेशिक सुरक्षेसाठी आवश्यक” असे म्हटले आहे. अमेरिकन प्रशासनाने आपल्या नागरिकांना मध्यपूर्वेतील काही भागांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकन सैन्य दल उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले आहेत. इस्रायलची सुरक्षा चिंता इस्रायलने आपल्या सीमावर्ती भागात संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी इराणकडून संभाव्य प्रत्युत्तराची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जागतिक प्रतिक्रिया युरोपियन देशांसह अनेक राष्ट्रांनी तातडीने शांततेचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आणि संवादाद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे. तज्ञांच्या मते,हा संघर्ष दीर्घकाळ चालल्यास तेल बाजारपेठ, जागतिक अर्थव्यवस्था आणि प्रादेशिक स्थैर्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

क्रीडा, ताज्या बातम्या, देश, महाराष्ट्र

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराड शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषण केली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराड शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषण केली आहे. त्यांनी सांगितले की, शासकीय योजना प्रभावीपणे राबवून, कराडला पाच वर्षांच्या आत एक आदर्श आणि सर्वोत्तम शहर बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले जाईल. यामध्ये शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यावर विशेष भर दिला जाईल, तसेच नागरिकांसाठी सुविधांचा विस्तार केला जाईल. बावनकुळे यांनी कराडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्याने कार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना कसा मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा विश्वास आहे की योग्य मार्गदर्शन आणि योग्य योजना राबवून कराडला एक आदर्श शहर बनवता येईल.

देश

विराट कोहलीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे

विराट कोहलीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे. त्याने २०२३ मध्ये सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आणि नंतर ५० शतकांचा टप्पा पार केला. कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप सोडताना अवघ्या १७ व्या वर्षी पदार्पण केले होते. त्याच्या कारकिर्दीत अनेक संघर्ष आणि आव्हाने आली, पण त्याने त्याला संधी म्हणून स्वीकारले आणि प्रत्येक टप्प्यावर आपली मेहनत आणि कौशल्य दाखवले. कोहलीचा आक्रमक खेळ, तंत्रज्ञानातील निपुणता आणि फिटनेसच्या बाबतीत जागरूकता यामुळे तो आधुनिक क्रिकेटमध्ये एक उदाहरण बनला आहे. त्याच्या यशामागे त्याच्या समर्पणाची आणि परिश्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आज, विराट कोहली क्रिकेट जगतातील एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो, ज्याने सचिन तेंडुलकरच्या अनेक विक्रमांना मागे टाकले आहे.

आंतरराष्ट्रीय, ताज्या बातम्या, देश, धर्म, महाराष्ट्र

दिल्ली मराठी साहित्य संमेलन

९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार उपस्थित होते. संमेलनात देशभरातील मराठी साहित्यिक, संशोधक आणि मराठी भाषा प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन विशेष महत्वाचे ठरले.

Scroll to Top